केंद्र सरकार शेतकऱ्यांचे ऊभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे !

Anil Parab & Nitin Gadkari
  • शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिक्रिया शिवसेनेचा गड़करीना टोला !!

राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आपल्याच केंद्रातील सरकारच्या कारभारा बाबत कदाचित अनभिद्न्य आहेत, केंद्रातले सरकार हे शेतकऱ्यांना अतिरेक्यांची उपमा देत आहेत , शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नेस्तनाबूत करणाऱ्या रानडुकरासारखे हे केंद्र सरकार काम करत आहे आणि गडकरी हे त्यांच्या सोबत आहेत , बैल किमान शेतकऱ्यांचा मित्र तरी असतो , आघाडी सरकार बैलासारखे असले तरी शेतकऱ्यांचे मित्र आहेत मात्र आपण रानडुकराची भूमिका बजावणाऱ्या सरकारचा भाग आहात तेव्हा आधी आपले पहा असा टोला लगावत शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यानी गडकरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER