पवारांच्या मागणीला केंद्र सरकारकडून तत्काळ दखल; केंद्रीय मंत्र्याचा थेट पवारांना फोन

Sharad Pawar - Sadananda Gowda

मुंबई : एकीकडे कोरोनाचे (Corona) संकट तर दुसरीकडे रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाकाळात शेतकरी अडचणीत सापडला आहे. रासायनिक खतांची दरवाढ म्हणजे ‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे’ आहे, असा संताप व्यक्त करून ही दरवाढ मागे घ्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. त्यांच्या या मागणीची केंद्राने तत्काळ दखल घेत थेट केंद्रीय मंत्री गौडा यांनी फोन करून लवकरच रासायनिक खतांच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले.

कोरोना संकटकाळात रासायनिक खतांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने देशभरातील शेतकरी अडचणीत सापडला. रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने कमी करावेत, अशी मागणी शरद पवार साहेबांनी पत्राद्वारे केली होती. केंद्रीय खत व रसायन मंत्री सदानंद गौडा (Sadananda Gowda) यांनी या प्रकरणी वैयक्तिकरीत्या या पत्राची दखल घेत पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. पत्रातील सूचनांचा अभ्यास करून पुढील दोन दिवसांत दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी पवार यांना दिले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button