भाजपला फायदा होईल म्हणून रामायणाला मंजुरी दिली नव्हती केंद्र सरकारने

Ramayan

एकदा रामानंद सागर (Ramananda Sagar) परदेशात गेले असता त्यांनी रंगीत टीव्ही पाहिला आणि ही वेगळी दुनिया असून यासाठी आपण मालिकांची निर्मिती केली पाहिजे असे त्यांनी ठरवले. आणि वाल्मिकी रामायणाची (Ramayana) निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय घरातल्यांना आवडला नाही आणि त्यांच्या मित्रांनाही. त्यामुळे कोणीही मदत केली नाही. तरीही रामानंद सागर आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी विक्रम वेताळ मालिकेतील राजा अरुण गोविलला राम बनवले.

याच मालिकेतील राणीला दीपिका चिखलियाला (Deepika Chikhalia) सीता बनवले आणि राजकुमार झालेल्या सुनील लाहिरीला लक्ष्मण आणि दारा सिंह यांना हनुमान बनवून रामायणाचे पायलट एपिसो़ड तयार केले आणि दूरदर्शनकडे मंजुरीसाठी पाठवले. परंतु सरकारला त्यांचा हा कॉन्सेप्ट आवडला नाही. डीडीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे होते ही मालिका हिंदू धर्माची महती गाणारी आहे.

त्यावेळी माहिती प्रसारण मंत्री बी. एन. गाडगीळ होते. त्यांना वाटले ही मालिका हिंदूंना एकत्र करेल आणि याचा फायदा भाजपला होऊन त्यांची व्होट बँक वाढेल. तसेच हिंदुंमध्येही अभिमानाची भावना जागेल असेही त्यांना वाटत होते त्यामुळे या मालिकेला परवानगी दिली नाही. मालिका मंजूर व्हावी म्हणून रामानंद सादर अनेक दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. परंतु त्यांना यश येत नव्हते. 1986 मध्ये अजीत कुमार पांजा नवीन माहिती प्रसारण मंत्री झाले आणि रामायण मालिकेला परवानगी मिळाली. हा सर्व किस्सा एन एपिक लाईफ रामानंद सागर फ्रॉम बरसात टू रामायण या प्रेम सागर लिखित पुस्तकात हा किस्सा सविस्तरपणे सांगण्यात आलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER