केंद्राने ‘ब्लू टिक’पेक्षा लसीकरणाकडे अधिक लक्ष द्यावे ; राष्ट्रवादीचा टोला

Maharashtra Today

मुंबई : ब्लू टिकवरून (blue tick)भाजप (BJP)आणि ट्विटरमध्ये वादंग पेटले आहे . या वादात राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे . राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ब्लू टिकपेक्षा लसीकरणाकडे अधिक लक्ष द्या, असा टोला मलिक यांनी भाजपाला लगावला आहे .

‘ब्लू टिक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने समजून घ्यावा, असे सांगतानाच ‘ब्लू टिक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यायला हवे,असे मलिक म्हणाले आहेत . ट्वीटरवर भाजप आणि केंद्रसरकार ‘ब्लू टिक’ ची लढाई लढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहेत. ट्विटरवरील ‘ब्लू टिक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याची टीका त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button