केंद्राने देशाची जाहीर माफी मागावी, आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; पी. चिदंबरम यांची मागणी

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने (The Lancet)  कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले, असे सांगत मोदी सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर केंद्राने देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी केली आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करत आक्रमक भूमिका मांडली.

आजच्या लॅन्सेटच्या अग्रलेखानंतर थोडी जरी लाज बाकी असेल तर सरकारने देशाची सार्वजनिक माफी मागावी. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्र्याने( Health Minister) त्वरित मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पी. चिदंबरम यांनी केली आहे. महामारीशी लढण्याचे काम एका मजबूत टीमवर आणि पंतप्रधानांवर सोडून द्यावे, आरोग्यमंत्री आणि डॉक्टर, सल्लागारांच्या टीमला त्यात स्थान देऊ नये, असा सल्लाही चिदंबरम यांनी केंद्राला दिला आहे.

लॅन्सेटचा अग्रलेख

भारतात ४ मे रोजीपर्यंत  दोन कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. दररोज भारतात साधारणतः ३ लाख ७८ हजार नव्या रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २ लाख २२ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे, असे लॅन्सेटच्या अग्रलेखात म्हटले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर नागरिकांसह डॉक्टरही ऑक्सिजन, बेड आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी मदत मागत आहेत. दुसरीकडे दुसरी लाट मार्चमध्ये येण्याआधी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भारताने कोरोनाला हरवल्याची घोषणा केली होती. जागतिक पातळीवर वारंवार दुसऱ्या कोरोना लाटेविषयी आणि कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत इशारा दिला जात होता, असेही नमूद केले आहे.

 

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button