डाळींची दरवाढ रोखण्यासाठी केंद्राने उचलले पाऊल

pulses

नवी दिल्ली : मागील काही दिवसात डाळींच्या किमती सतत वाढत आहेत. सणांच्या दिवसा डाळींचे दर नियंत्रणात रहावे यासाठी केंद्राने राज्यांना अतिरिक्त अनुदानित स्वरुपात डाळी उपलब्ध करुन दिल्या आहेत. या डाळींमध्ये तूर आणि उडदाच्या डाळींचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्राने किमान आधारभूत दर अधिक दहा टक्के दराने राज्यांना तूर आणि उडदाची डाळ उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली होती. आता त्या दृष्टीनं पावले उचलली आहेत. त्यामुले उडदाच्या डाळीचे दर ७६ रुपये ते ८१ रुपये किलो असल्याचं लक्षात आले आहे.

तूरडाळ ८५ रुपये किलोने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने हा निर्णय घेतला असला तरीही अजून राज्याकडून केंद्राकडे डाळींच्या मागणीची नोंद करण्यात आली नसल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER