केंद्राने घटवले रेमडेसिवरचे भाव , राज्यात ‘तू तू-मै मै’चं राजकारण !

Nawab Mailk - Maharastra Today
Nawab Mailk - Maharastra Today

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं आरोग्य आणीबाणी निर्माण झालीये. रेमडेसिव इंजेक्शनचा (Remdesivir Injection) काळाबारज सुरु असताना केंद्रानं मात्र यावर कठोर पावलं उचलली आहेत. रेमडेसिवर इंजेक्शन आणि औषधाच्या किंमती किमान ५० ते कमाल ६० टक्क्यांपर्यंत कमी केल्यात. असं असताना, राज्यात गंभीर परिस्थीती असतानासुद्धा राजकारणाची संधी सोडली महाविकास आघाडी सोडत नसल्याचं बोललं जातंय. याला कारण ठरलंय राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केंद्रावर केलेली टीका.

महाराष्ट्राला (Maharashtra) रेमडेसिवीर मिळू नये म्हणून केंद्र सरकारकडून कंपन्यांना धमकावलं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी आव्हान दिलं आहे. मलिक यांनी आरोप सिद्ध करावेत, अन्यथा माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

“आरोप सिद्ध करा नाहीतर राजीनामा द्या”- प्रवीण दरेकर

नवाब मलिकांच्या आरोपाला प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, “रेमडेसिवीर देण्यात राज्य सरकारच अपयशी ठरले आहे. ऑक्सिजन (Oxygen) अभावी लोक मरत आहेत. त्यामुळे स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नवाब मलिक आरोप करत आहेत. इतर राज्यातील कंपन्या रेमडेसिवीर देण्यास तयार आहेत. एफडीएचे अधिकारी काळे यांनी तसा या कंपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्र न् दिवस बैठका घेऊन काम करत आहेत. इकडे मलिक एक बोलत आहेत तर आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) दुसरंच बोलत आहेत. राजकीय उद्देशानेच केवळ बोललं जात आहे. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खालल्या जातंय, असं सांगतानाच मलिक यांनी नुसते आरोप करू नयेत. राजकीय स्टंटबाजी करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. त्यांनी पुरावे द्यावेत. अन्यथा राजीनामा देऊन माफी मागावी,” असं दरेकर म्हणाले. मलिकांनी पुरावे दाखविल्यास आम्ही महाराष्ट्राची माफी मागू, असंही ते म्हणाले.

रेमडेसिवीर इंजेक्शन माफियांना आवर घालण्याची गरज

कोरोनाच्या लाटेचा महाराष्ट्राला जबरदस्त फटका बसलाय. मृतांचा आकडा झपाट्याने वाढतोय. मागच्या लाटेमध्ये बेड्स फक्त कमी पडत असल्याचं चित्र होते आता मात्र बेड्ससोबत औषधं आणि इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. ऑक्सीजनसुद्धा मिळत नाहीये. त्यामुळंच यंदाची कोरोनाची लाट महाभयंकर आहे ही गोष्ट ठळकपणाने दिसून येतीये. राज्यात इतकी भयानक परिस्थीती असतानासुद्धा राज्यात औषधांचा काळाबाजार आणि सामान्यांचा खिसा कापायचा उद्योग राजरोज सुरु आहे. राज्यसरकार मात्र यावर कारवाई करताना दिसत नाहीये.

सोशल मिडीयावर उमटतायेत प्रतिक्रिया

राज्यात लॉकडाऊन लागायच्या आधीपासून औषधांची कमतरता ठळक जाणवत होती. रेमडेसिवीर सारखी इंजेक्शन आणि ऑक्सीजनचा तुटवडा हे ठळकपणे दिसत होतं. तरी राज्यसरकारला या तुटवड्याला भरुन काढता आलेलं नाही. रेमिडीसीव्हरसारख्या इंजेक्शनची राज्यात २० हजार रुपयानं विक्री सुरुये. समाजमाध्यमांवर रुग्णांचे नातेवाईक त्यांचं गऱ्हाणं मांडत आहेत. औषध मिळावेत म्हणून लागलेल्या लांबच लांब रांगा याची ग्वाही देतात.

कोरोनाच्या (Corona) उपचारासाठी जगभरात विविध औषध वापरली जात आहेत. काही औषधांचा वापर योग्य आहे का नाही याबद्दल इतर देशांमध्ये चर्चाच सुरु असताना भारतात या औषधांन असाधारण महत्त्व प्राप्त झालंय. भारतात आरोग्य आणीबाणीचा काळ आहे. रुग्णाचा जीव वाचनं महत्त्वाचा आहे. रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपयुक्त असल्याचं बोललं जातंय. भारतातील औषध निर्यातीवर बंदी आहे. फक्त भारताला पुरेल इतकी मागणी सुद्धा औषध कंपन्या पुर्ण करु शकत नसल्यामुळं राज्यात चिंतेच वातावरण आहे.

भारतात कोरोना रुग्णांची आकडेवारी बघितली तर दोनच दिवसात दोन लाख नवे रुग्ण सापडलेत. रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळं रेमडेसिवीर मागणी वाढते आहे. रेमडेसिवीरची मागणी वाढल्यामुळं त्याच्या काळ्याबाजारातही वाढ झाल्याचं दिसून येतंय. १०० ग्रँम रेमडेसिवीरची किंमत २५ हजार रुपये सांगितली जात आहे. असे सहा डोस लागतात. तेव्हाच औषधांचा कोर्स पुर्ण झाल्याचं मानलं जातं. काही रुग्णांना याहून दोन डोस जास्तीचे द्यावे लागतात. म्हणजे एकूण ८ डोस द्यावे लागतात.

कोरोनावरील उपचारासाठी फक्त रेमिडीसीव्हरच नाही तर सोबतच आर्थरायटिज या सांधिवातावरील औषधाची मागणी वाढलीये. या औषधाला कोरोनावरील उपचारांसाठी वापरलं जातं. शिवाय तुडवड्यामागचं कारण म्हणजे औषध विक्रेत्यांनी स्वतःसोबत कुटुंबीयांची तजवीज करण्यासाठी औषध राखून ठेवली आहेत. त्यामुळं अतिरिक्त ताण पडत असल्याचं बोललं जातंय.

ही बातमी पण वाचा : पॅकेज सर्वसामावेशक आहे? लॉडाऊन काळात ‘या’ घटकांचा विचार होणं आवश्यक !

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button