केंद्राकडे ना धोरण, ना उपाययोजना, आम्हाला बोलूच दिले नाही; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

Mamata Banerjee - PM Narendra Modi

नवी दिल्ली :- कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रत्येक राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्याशी संवाद साधला. यात महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. पश्चिम बंगालचे एकही जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच (Mamata Banerjee) हजर होत्या. यावेळी ममता बनर्जींनी पंतप्रधान मोदींवरच हल्ला चढवला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिले नाही. केंद्राकडे ना कोणते धोरण, ना कोणती उपाययोजना, असे असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिले नाही. भाजपच्या (BJP) काही मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधान मोदी यांनी मुद्दे मांडले. आम्हाला वॅक्सिन अर्थात लसीची मागणी करायची होती. मात्र, यावर बोलूच दिले नाही.” असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

“या बैठकीत कोरोना कमी होत असल्याचे मोदी म्हणाले. आम्ही तीन कोटी लसींची मागणी करणार होतो. या महिन्यात १४ लाख लसी मिळणार होत्या. केवळ १३ लाख लसी मिळाल्या.” असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button