सीबीआय टीम पुन्हा अनिल देशमुखांच्या घरी परतली, दौऱ्यावर निघालेले देशमुखही परतले

CBI - Anil Deshmukh - Maharastra Today

नागपूर : सध्या उपराजधानी नागपुरात हाय व्होल्टेज नाट्य सुरू आहे. भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून (CBI) गुन्हा दाखल झाला आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापा टाकल्यानंतर सीबीआयची टीम आज सकाळी नागपुरातील घरावर धडकली होती. तब्बल १० तास देशमुखांची चौकशी केल्यानंतर सीबीआयची टीम अनिल देशमुखांच्या घराबाहेर पडली होती. मात्र काही मिनिटातच पुन्हा एकदा सीबीआयची एक टीम देशमुखांच्या घरी पोहोचली. तसेच सीबीआयने देशमुखांना आपला दौरा सोडून येण्यास सांगून परत बोलावले आहे.

अनिल देशमुख हे काटोल, नरखेड या ठिकाणी कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी घरून निघाले होते. मात्र काही वेळाने सीबीआयची टीम पुन्हा अनिल देशमुख च्या घरी दाखल झाली आहे. सर्व मुद्देमाल घेऊन टीम पुन्हा अनिल देशमुख यांच्या घरी पोहोचली आहे. अनिल देशमुख सुद्धा नियोजित कार्यक्रम सोडून घरी दाखल झाले आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचं नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button