सीबीआयने रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला, शुक्लांना साक्षीदार करण्याची तयारी

Maharashtra Today

मुंबई : अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणात सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला (CBI recorded the reply of Rashmi Shukla)आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Rashmi Shukla) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप केला होता. या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला ( Rashmi Shukla)यांचा जबाब नोंदवण्यात आला.

सीबीआयने याआधी अनिल देशमुख, त्यांचे दोन पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचे जबाब नोंदवले आहेत. तर निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि त्याच्या दोन वाहन चालकांसह अनेकांचे जबाब रेकॉर्ड करण्यात आले आहेत. २१ एप्रिल रोजी हैदराबाद येथे जाऊन सीबीआयने रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्याची माहिती आहे.

दरम्यान, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारकडून चौकशी होण्यापूर्वीच महाविकासआघाडीचा ‘कार्यक्रम’ उरकून टाकला, असे विधान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले होते. हैदाराबादमध्ये काही दिवसांपूर्वी सीबीआयने रश्मी शुक्ला यांची चौकशी केली. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची नावं उघड केल्याचा गौप्यस्फोट अतुल भातखळकर यांनी केला आहे. तसेच भातखळकर यांनी बुधवारी यासंदर्भात ट्विट करुन भाष्य केले होते. त्यामध्ये रश्मी शुक्ला यांनी सीबीआय चौकशीत दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतल्याचा दावा भातखळकर यांनी केला होता. यापैकी एक अनिल म्हणजे देशमुख तर दुसरे अनिल म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब असण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button