मामला पाच भाषांतल्या सिनेमाचा 

Chori Cha Mamla

मराठी चित्रपटांनी आजवर अनेक विक्रम केले आहेत आणि मराठी चित्रपटांच असं एक अढळ स्थान निर्माण केल आहे. अगदी राष्ट्रीय पुरस्कार पटकावत ते पार सातसमुद्रापार जाऊन मराठी चित्रपटांची एक वेगळी ओळख आहे. अश्याच एका मराठी चित्रपटाने मराठी चित्रपटांची मान उंचावली आहे. आपण हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटाचं डबिंग बघतो तर अश्यातच आपल्याला एक मराठी चित्रपट लवकरच ५ भाषा मध्ये बघायला मिळणार आहे.

” चोरीचा मामला ” हा पहिला मराठी चित्रपट आहे जो पाच भाषा मध्ये येणार आहे. हा पहिलाच चित्रपट असून त्याने एक वेगळा विक्रम नोंदवला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ” चोरीचा मामला ” या चित्रपटावर एक वेगळा विक्रम या निमित्ताने नोंदवला जाणार आहे. हवं चित्रपट मल्याळम , तेलगू , तमिळ , कन्नड आणि हिंदी या पाच भाषा मध्ये निर्मिती होणार आहे. पाच भाषा मध्ये निर्मिती होणारा ” चोरीचा मामला ” हा एकमेव आणि पहिला मराठी चित्रपट आहे.

नुकतेच सोशल मीडियावर प्रियदर्शन जाधवने चोरीचा मामला च्या सर्व मुख्य कलाकारांचा एक फोटो शेअर  केला आहे, ज्यामुळे “चोरीचा मामला २” मध्ये हे सर्व कलाकार दिसतील याची खात्री झाली असून त्यांच्यासोबत नवीन कोण कलाकार दिसणार का? याची मात्र अजून उत्सुकता आहे.

स्वरुप स्टुडिओज निर्मित एवरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत

सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर,  सचिन नारकर, विकास पवार,स्मिता ओमाळे यांनी “चोरीचा मामला” या चित्रपटाची निर्मिती केली होती. प्रियदर्शन जाधव लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग अशी स्टारकास्ट होती. एक प्रामाणिक चोर एका बंगल्यात चोरी करायला गेल्यावर कसा अडकत जातो याची धमाल गोष्ट या चित्रपटात होती. गुंतवणून ठेवणारी पटकथा, खुसखुशीत संवाद आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर या चित्रपटानं प्रेक्षकांची दाद मिळवली. आता मराठीची सीमा ओलांडून पाच  वेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट तयार होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही निश्चितच अभिमानाची घटना आहे.

मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटातील पात्र देखील तितकीच कमालीची आहेत. अमृता खानविलकर , जितेंद्र जोशी , हेमंत ढोमे , क्षिती जोग , प्रियदर्शन जाधव असे दर्जेदार कलाकार असलेल्या सगळ्यांनी सोबत येऊन हा चित्रपट केला होता. गुंतवणूक ठेवणारी पटकथा , खुशखुशीत संवाद आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर या चित्रपटाने प्रेक्षकांची दाद मिळवली. मराठी सीमा ओलांडून पाच वेगळ्या भाषामध्ये हा चित्रपट तयार होणार आहे.

मराठी चित्रपटासाठी ही कौतुकाची बाब आहे. आजवर अनेक मराठी चित्रपटांनी अनेक विक्रम केले आहेत त्यात या चित्रपटाची भर पडली आहे. चित्रपटाचे कलाकार हे या कारनाने भलतेच खुष आहेत. मराठी चित्रपट हे नेहमीच वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट तयार करत असतात. विषयाच वेगळेपण जपून प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी करण्याकडे नेहमीच मराठी चित्रपटाचा कल असतो. ” चोरीचा मामला २ ” हा चित्रपट येणार का किंवा त्यात हेच कलाकार दिसणार का याबद्दल उत्सुकता आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकून घेण्याकडे मराठी चित्रपट हे खूप खास आहेत.

प्रियदर्शन जाधव ने या चित्रपटाची खुशखुशीत कथा लिहिली होती आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन केल होत. हा चित्रपट सगळ्याच कलाकारांसाठी खास आहे. अभिनयाची उत्तम जाण असलेले सगळे कलाकार या चित्रपटात होते आणि म्हणून हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचला. ” चोरीचा मामला ” चित्रपटाच आणि संपूर्ण टीमच खूप कौतुक आणि खूप शुभेच्छा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER