पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर रोहित पवार यांनी सुरू केली ही मोहीम

Rohit Pawar

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित कराताना पाच एप्रिलला सर्वांनी 9 मिनिटांसाठी घरातील सर्व लाईट्स बंद करून दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावण्याचे आवाहन केले. मोदींच्या या आवाहनाचे राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले सर्वांना एकत्रित आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा असे रोहित पवार म्हणाले.

मोदींच्या आवाहनानंतर रोहित यांनीही एकतेचा संदेश पोहचवण्यासाठी म्हणून एक मोहीम सुरू करूया असे आवाहन केले आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर राष्ट्रध्वजाचा डीपी ठेवून एकतेचा हाच संदेश घट्ट करू असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी राष्ट्रध्वजाचा फोटो ठेवून ही मोहीम सुरू केली आहे.

दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान @narendramodi जी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो.
असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.