बस ड्रायव्हरचा मुलगा आहे सुपरस्टार यश

Yash

ज्याप्रमाणे साऊथचा नायक प्रभास ‘बाहुबली’ सिनेमामुळे संपूर्ण देशात लोकप्रिय झाला. तशाच पद्धतीने साऊथचा आणखी एक स्टार यश ‘केजीएफ’ या सिनेमामुळे प्रचंड लोकप्रिय झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. याच केजीएफचा आता दुसरा भाग येत असून त्यात संजय दत्त (Sanjay Dutt) व्हिलनची भूमिका साकारत आहे. सध्या सुपरस्टारपदाला पोहोचलेला यश अत्यंत साधारण घरातून आलेला अभिनेता आहे. त्याचे वडिल बस कंडक्टर होते आणि यशनेही यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे.

यशचा (Yash) जन्म कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात झालेला असून त्याचे वडिल कर्नाटक स्टेट रोडवेज ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये बस ड्रायव्हर आहेत. त्याचे वडिल अजूनही बस ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याचे यशने स्वतःच सांगितले आहे.

यशने स्वतःबाबत बोलताना सांगितले. मी अत्यंत साधारण कुटुंबातील असून माझे वडिल अजूनही बस ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांच्यासाठी त्यांचे काम खूपच महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच त्यांनी रिटायरमेंट घेतलेली नाही. ते अत्यंत साधे राहातात आणि त्यांच्यामुळेच मलाही साधेपणाची सवय लागली आहे. प्रख्यात निर्माता दिग्दर्शक एसएस राजमौलीनेही यशपेक्षा त्याचे वडिल माझ्यासाठी मोठे स्टार आहेत असे म्हटले आहे. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा असून त्याने करिअरची सुरुवात नाटकांमध्ये काम करून केली. प्रख्यात नाट्यकर्मी बी. व्ही. कारंथ यांच्या बेनका थियेटरमध्ये यशने काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने टीव्ही सीरीयलमध्ये काम केले. त्याने काही जाहिरातींमध्येही काम केले. त्यानंतर 2007 मध्ये त्याने कन्नड़ सिनेमा ‘जंबाडा हुदुगी’मध्ये सेकंड लीड साकारत रुपेरी कारकिर्दीला सुरुवात केली होती. यशने 2017 मध्ये यश मार्ग फांउडेशनची सुरुवात केली असून गरजवंताना त्याची ही संस्था मदत करते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER