मराठा क्रांती मोर्चा कडून संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन

Maratha Kranti Morcha

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल अक्षेपार्ह विधान करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध करत मराठा क्रांती मोर्चाने त्यांचा पुतळा जाळला. हे आंदोलन दुपारी गुरूवारी एपीआय कॉर्नर येथे करण्यात आले. एका दैनिकातर्फे आयोजित जाहीर मुलाकती दरम्यान खा. संजय राऊत यांनी ते छत्रपती शिवाजी महारांजाचे वंशज असल्याचा पुराव द्यावा असे विधान केले हाेते. या विधानाचे तीव्र पडसाद राज्य भर पडसाद उमटले आहेत.

छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्या संजय राऊतांवर नितेश राणेंचा हल्लाबोल

खा. संजय राऊत यांनी माफी मागावी , अशी मागणी करत मराठा क्रांती माेर्चाने गुरूवारी एपीआय कॉर्नर येेथे आंदोलन केले. खा. संजय राऊत यांच्या स्त्री वेशातील प्रतिमा असलेल्या बॅनरला आणि छायाचित्राला जोडे मारण्यात आले. तसेच राऊत यांचा पुतळा जाळून जाहीर निषेधच्या घोषणा दिल्या. यावेळी सुनिल कोटकर, निलेश ढवळे, नितीन पाटील, लक्ष्मण मोटे, राहुल बचाटे, ज्ञानेश्वर अंभोरे, रंगनाथ खेडेकर, शिवाजी शिदे यांचा सहभाग होता.