ईडीची टीम घरात येताच बिघडली बिल्डरची प्रकृती, रुग्णालयात दाखल

Yogesh Deshmukh - ED Raid

कल्याण (ठाणे) : टिटवाळा येथील जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी ईडीची (ED) टीम कल्याण येथील मोठे बिल्डर योगेश देशमुख (Yogesh Deshmukh) यांच्या घरी पोहचताच योगेश यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी देशमुख यांच्या कुटुंबियांनी आरोप केला की, “शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यासोबतचा जमिनीचा व्यवहार पूर्ण झालेला नाही तरीही आम्हाला त्रास देऊन घाणेरडे राजकारण सुरू आहे.

प्रकरण

प्रताप सरनाईक यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. टिटवाळा येथील गुरुवली परिसरात आमदार प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जागा आहे, असा दावा करत ही जागा ईडीने जप्त केल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. प्रताप सरनाईक यांनी ही जमीन योगशे देशमुख या बिल्डरकडून घेतली असल्याची चर्चा आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत देशमुख यांच्या पत्नीचा वाद

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास आठ ते दहा अधिकाऱ्यांची एक टीम कल्याण पश्चिम येथील ‘गोदरेज हिल’ परिसरातील देशमुख यांच्या बंगल्यात दाखल झाली. सुरुवातील ईडी अधिकाऱ्यांसोबत देशमुख यांच्या पत्नीचा वाद झाला. याच दरम्यान योगेश देशमुख यांची तब्येत बिघडली. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आमच्यावर दबाव, देशमुख यांच्या पत्नीचा आरोप

याप्रकरणी योगेश यांची पत्नी शीतल यांनी आरोप केले कि, “माझा पती योगेश देशमुख यांना कोरोना झाला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासोबत जमिनीचा व्यवहार झालाच नव्हता. त्याबाबत केस केली आहे. मात्र, प्रताप सरनाईक यांची ही जागा घेतली आहे आणि पैसे मनी लॉन्ड्रींगसाठी वापरले असे तुम्ही म्हणा, असा आमच्यावर दबाव टाकला जातो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER