अयोध्येतील राम मंदिरासाठी या निर्मात्याने दिले एक कोटी रुपये

manish mundra

सर्वोच्च न्यायालयाने (SC) अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थळी मंदिर (Ram Temple Ayodhya)बांधण्यास परवानगी दिल्यानंतर यासाठी एका न्यासाची स्थापना करण्यात आली. जवळ जवळ ११०० कोटी रुपये खर्च करून अयोध्येत भव्य असे मंदिर बांधले जाणार आहे. मंदिराच्या बांधकामासाठी देणगी गोळा करण्यासाठी न्यासासोबतच विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते घरोघर जाऊन पैसे गोळा करीत आहेत. या मंदिरासाठी अनेक उद्योगपती सगळा खर्च करण्यास तयार असतानाही न्यासाने प्रत्येक रामभक्ताकडून पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी दिली होती. त्यानुसार घरोघरी जाऊन पैसे गोळा केले जात आहेत. राम मंदिराच्या बांधकामासाठी देणगी देणाऱ्यांमध्ये हिंदी आणि साऊथचे कलाकार आघाडीवर आहेत. एका निर्मात्याने तर नुकतेच या मंदिरासाठी एक कोटी रुपये (RS 1 Crore)देणगी म्हणून दिले आहेत.

राम मंदिरासाठी पैसे देण्यास सर्वप्रथम अक्षयकुमारने सुरुवात केली होती. त्याने एक व्हिडीओ रिलीज करून जास्तीत जास्त लोकांनी राम मंदिरासाठी देणगी द्यावी असे आवाहनही केले होते. त्यानंतर प्रणिता सुभाष, रामायणात रामाची भूमिका करणारे अरुण गोविल, सीतेची भूमिका करणाऱ्या दीपिका चिखलिया, रामायण या सिरीयलमघ्ये रामाची भूमिका करणाऱ्या गुरमित चौधरी आणि काही दिवसांपूर्वी प्रख्यात गायक सोनू निगमनेही उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही राम मंदिराबाबत भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांना भेटण्यापूर्वी सोनू अयोध्येला गेला होता आणि त्याने श्रीराम मंदिरात जाऊन रामललांचे दर्शनही घेतले होते. त्यानेही मंदिरासाठी देणगी दिली आहे. तसेच राम मंदिरासाठी एक वीट देणार असल्याचेही त्याने सांगितले.

या यादीत आता प्रख्यात निर्माता दिग्दर्शक मनीष मुंद्रा (Manish Mundra) यांचेही नाव जोडले गेले आहे. मनीष मुंद्राने यापूर्वी राज्यांवर आलेल्या विविध संकटांमध्ये भरघोस आर्थिक मदत केलेली आहे. ‘मसान’ आणि ‘न्यूटन’ सिनेमाची निर्मिती करणाऱ्या मनीषने राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : ‘मैदान’ आणि ‘आरआरआर’मध्ये होणार टक्कर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER