प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वादात अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर

Naresh Mhaske - Vidhan Bhavan

ठाणे : मागील पाच वर्षापासून अर्थसंकल्प जरी वेळेत सादर केला जात असला तरी त्याला मंजुरी मिळण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबरचा कालावधी जात आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसकंल्प हा 31 मार्च पूर्वी मंजुर करावा यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी सुचना केल्या आहेत. परंतु मागील आठवडय़ात व्हॉट्सअँपवरील मुद्दा चांगलाच रंगल्याने यंदाचा अर्थसंकल्प वेळेत सादर होईल का नाही, या बाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडल्याने यंदाचा अर्थसंकल्पही लांबणीवर पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील काही वर्षे या ना त्या कारणाने 31 मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होवून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याचा विपरीत परिणाम नागरी सुविधा कामांवर होत असतो. विकासकामे वेळेत होत नसल्यामुळे नागरिकांचा रोष स्थानिक लोकप्रतिनीधीवर व्यक्त होतो.

तसेच महापालिका कार्यक्षेत्रतील नागरिक देखील याबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थीत करीत असतात व महापौर या नात्याने सर्व प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचे महापौर यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या पुढील काळातील अर्थसंकल्प विहीत मुदतीत मंजूर करुन नियोजित कामे वेळेत व्हावीत या दृष्टीकोनातून सन 2क्2क्-21 चा अर्थसंकल्प 31 मार्चपूर्वी मंजूर होईल या दृष्टीने कार्यवाही करणोसाठी लेखी सूचना महपौरांनी प्रशासनाला दिली आहे.

महापालिका प्रशासनाकडून सुरवातीला हा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला जातो. त्यानंतर जवळ जवळ तीन दिवस स्थायी समितीमध्ये त्यावर चर्चा होते. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो स्थायी समितीकडून महासभेत सादर केला जातो. महासभेत देखील यावर तीन ते चार दिवस चर्चा होते. त्यानंतर त्यावर महापौरांचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर प्रशासनाकडे पाठविला जातो. मात्र त्याची अंमलबजावणी करायची की नाही, याचा अधिकार हा प्रशासनाला असतो. परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वादामुळे मागील काही वर्षात हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी ऑक्टोबर ते डिसेंबरचा कालावधी जात आहे. आता देखील लोकप्रतिनीधी आणि प्रशासनात व्हॉट्सअॅपवरील मेसेजवरुन मागील आठवडय़ात गदारोळ झाल्याने त्याचे परिणाम आता अर्थसंकल्प पुन्हा एकदा लांबणीवर पडण्यात झाले आहेत.

आपण यापूर्वीच प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, तसेच स्थायी समिती सभापतींना देखील या संदर्भात पत्रव्यवहार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळेत अर्थसंकल्प सादर होईल अशी अपेक्षा आहे.
(नरेश म्हस्के – महापौर, ठामपा)

अर्थसंकल्प वेळेत स्थायी समितीला सादर करावा यासाठी आपण पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. आता प्रशासनाने तो वेळेत सादर करावा जेणो करुन विकास कामे देखील वेळेवर मार्गी लागतील.
(राम रेपाळे – स्थायी समिती, सभापती – ठामपा)