भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना कधीकाळी मुघल दरबारात दररोज गयावया करावी लागायची!

Maharashtra Today

अकबर बादशाहाचा मृत्यू झाला ३ नोव्हेंबर १६०५ साली. याच्या आठव्या दिवशी मोठा मुलगा ‘मिर्जा नुरुद्दीन बेग मोहम्मद खान सलीम जहांगीर'(Mirza Nuruddin Beg Mohammad Khan Salim Jahangir) आग्र्याच्या गादीवर आला. मुघल वंशाचा चौथा बादशाह जहांगिर होता. यांनतर ३० ऑगस्ट १५६९ मध्ये राजा भारमलची मुलगी मरियम जमानीच्या पोटी जन्मलेला जहांगीर एक व्यसनी आणि उनाड, दारूडा युवराज होता. त्यावेळी मुघल साम्राज्य अफगाणच्या कंधारपासून बंगालपर्यंत पसरलं होतं. हा तो काळ होता जेव्हा इंग्रजांचा खजिना रिता झाला होता. पोर्तूगिजांशी भारताचे मोठ्या कालावधीपासून मजबूत संबंध होते. इंग्रजांना भारताशी व्यापार पुर्णपणे स्वतःच्या ताब्यात घ्यायचा होता.

इंग्लंडहून भारतात राजदुत पाठवण्यात आला. इंग्रजांशी भारताचे व्यापारी संबंध सुधारावेत यासाठी मुघल दरबारात राजा जेम्स प्रथम यानं व्यापारात अनुकुलता निर्माण करावी यासाठी ‘थॉमस रॉ’ हा राजदूत पाठवला. भारताला व्यापाराचं केंद्र बनवण्यासाठी इंग्रजांचे अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु होतेच. ईस्ट इंडीया कंपनीनं सुमात्राच्या बँटममध्ये पहिली व्यापारी वसाहत उभारली.इंग्रज बँटममधून लोकरीचे कपडे खरेदी करुन जगभरात त्याचा व्यापार करत असत. लवकरच आशियातील बाजारपेठा काबीज करण्याचा त्यांचा मनोदय होता. ते भारताकडे आकर्षित झाले.

थॉमस रो यांना राजदूत बनवून भारतात पाठवलं

आग्रा, दिल्ली आणि लाहोरमध्ये मुघलांची मोठी चलती होती. मुघल दरबाराची भव्यता आणि विस्तृत्ता होती. १६०८ मध्ये ‘हेक्टर’ जहाजाचा नौअधिकारी विलियम हॉकिन्सनं व्यापाराची अनुमती मिळवण्यासाठी बादशाह जहांगीराच्या दरबारात आला. यावेळी युरोपातील त्यांचे प्रतिस्पर्धी पोर्तूगलांनी आग्रा दरबारात आपला दबदबा निर्माण केला होता. यामुळं बिना कोणत्याच संमतीचं, रिकाम्या हातांनी जहांगीराच्या दरबारातून विलियम हॉकिन्स यांना परताव लागलं. परंतू जहांगीर बादशाह हॉकिन्स यांची तुर्की भाषेवरील पकड पाहून प्रभावीत झाले होते. अशात मुघल दरबारात जाऊन स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर जहांगीर बादशाहचे मन जिंकेल अशा अधिकाऱ्याची इंग्रज शोधाशोध करत होते.

ईस्ट इंडीया कंपनीनं मुघल दरबारात थॉमस रो यांना इंग्लंडच्या राजाचं पत्र घेऊन राजाचा राजदूत म्हणून इंग्लंडहून भारतात पाठवलं. पुढं ३ वर्ष थॉमस आग्र्यात राहीले. स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर त्यांनी मुघल दरबारात स्वतःच स्थान जस जसं बळकट केलं तसं पोर्तूगीजांचा दिल्ली दरबारातील प्रभाव संपुष्टात आला.

भेटीसाठी बरीच वेळ वाट पहावी लागली होती

२ फेब्रुवारी १६१५ साली थॉमस यांनी भारताकडे समुद्र मार्गाने कुच केली. सहा महिन्यांचा दिर्घकाळ प्रवास करत सुरतमध्ये ते उतरले. इथं पोहोचल्यानंतर जनरल किलिंग यांनी सुरतचा मुघल सरदार ‘जुल्फिकार खान’ याला इंग्लंडहून राजदूत आल्याचा निरोप पोहचता केला. जुल्फिकार खानाने रो यांच स्वागत केलं. बादशाह जहांगीरच्या दरबारात १० जानेवारी १६१६ साली व्यापारासाठी संमती देणाच्या विषयावर सुनवाई झाली. जहांगीर बादशाहच्या नम्र आणि दयाळू स्वभावानं रो यांना प्रभावीत केलं होतं.

असं असलं तरी बादशाहाने इंग्रजांना व्यापार विषयक सर्वसंमती दिली नव्हती. थॉमस रो यांच्याकडे चिकाटी होती. त्यांनी सलग तीन वर्ष मुघल दरबारात जागा मिळवण्यासाठी खर्च केले. एकदा सुरतमध्ये मुघल सरदारांनी इंग्रजांचा माल जप्त केला. तेव्हा जहांगीरचा मुलगा शेहजादा खुर्रम याच्याकडे तो माल सोडून द्यावा अशी विनंती केली. दरबारात स्वतः बाजू मांडून त्या मालाची सुटका करावी म्हणून त्यानं वारंवार गयावाया केली. इंग्रजांचा राजदूत थॉमस रो रंडकुंडीला आल्यावर त्यांचा माल सोडून देण्यात आला. असं अनेकदा करण्यात आलं इंग्रजांच्या राजदूताला माल सोडवण्यासाठी अक्षरशः भीक मागितल्याप्रमाणं गयावया करायला लावल्याच्या अनेक घटना यानंतर घडल्या. शेवटी थॉमस रोवर दया आल्यानंतर शेहजादा खुर्रम यांनी इंग्रजांच्या भारतातील व्यापारासाठी दोन फर्मान काढले.

आणि मुघलांनी स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड

शेवटी बरीच गयावया केल्यानंतर मुघलांनी इंग्रजांना मुक्त व्यापाराची सुट दिली. हा निर्णय मुघलांसाठी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारल्या सारखा होता. यानंतर इंग्रजांनी व्यापारात वृद्धी केली. व्यापारात वाढता प्रभाव लक्षात घेऊन इंग्रजांनी भारतभर साम्राज्यविस्ताराला सुरुवात केली इंग्रजांनी ज्या मुघल दरबारात कधीकाली गयावया केली होती त्याच मुघलांच्या शेवटच्या बादशाहाला कैद करुन इंग्रजांनी भारतावर स्वतःचा अधिकार प्रस्थापित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button