स्टेन गन मुळं वाचले ब्रिटीश आणि हारले जर्मन!

Maharashtra Today

दुसऱ्या महायुद्धात अनेक हत्यारांनी सैन्याला युद्ध जिंकून दिली. अशक्य वाटणाऱ्या आणि पराभव अटळ मानल्या जाणाऱ्या मैदानातही विजय मिळवून देण्यासाठी त्या काळातल्या हत्यारांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या पैकी एक आहे. ‘स्टेन गन’ (Stan Gun )जर्मनीच्या पराभवाच्या महत्त्वपुर्ण कारणांपैकी एक. या युद्धात अनेक एकापेक्षा एक रायफल वापरण्यात आल्या परंतू स्टेनगन याहून वेगळी ठरली. आजही ती स्वतःची वेगळी ओळख टिकवून आहे.

नाझी सैन्याकडे लढण्यासाठी हत्यारं नव्हती

ही गोष्ट आहे १९४० ची, दुसऱ्या महायुद्धाला नुकतीच सुरुवात झाली होती. नाझी सैन्यानं एकापाठोपाठ एक हल्ले सुरु केले होते. सुरुवातीच्या काळात नाझी सैन्य सर्वात शक्तीशाली होतं. त्यांच्याशी लढणं जवळपास अशक्य मानलं जायचं. नाझी सैन्यानं युरोप गिळायला सुरुवात केली. एकाच वेळी अनेक राष्ट्रांवर त्यांनी धावा बोलला. जर्मनीच्या तीन लाख सैन्यानं संपुर्ण यरोपात धुमाकुळ घालून डंकर्क बेटापर्यंत मजल मारील. तिथं ब्रिटीश सैन्य अडकं होतं. यानंतर मोठ्या अडचणींचा मुकाबला करत तिथल्या सैन्याला हलवण्यात आलं. इंग्लंडला नेण्यात आलं. या धांदलीत सैन्यानं त्यांच्या पिस्तूला तिथच टाकल्या होत्या.

काही काळातच ‘बॅटल ऑफ ब्रिटन’ला (Battle Of Britain) सुरुवात झाली. त्यात इंग्लंडच्या अनेक हत्यारांचे कारखाने जळून खाक झाले. युद्धाच्या सुरुवातीलाच हत्यारांची कमतरतेत इंग्लंडची अवस्था बिकट झाली होती. अमेरिकेकडून ब्रिटननं हत्यारं विकत घेतली पण जशी अमेरिकेने युद्धात उडी घेतली ब्रिटनला होणारा हत्यारांचा पुरवठा बंद झाला. हत्यारांची कमतरता इंग्लंडच्या पराभवाचं कारण बनु शकत होती. देशावर संकट होतं आणि निर्णय लवकरात लवकर घेण्याची गरज होती.

स्वस्त आणि दमदार स्टेन गन घेऊन पुन्हा ब्रिटनची युद्धात उडी

इंग्लंड समोरील जवळपास सर्वच रस्ते बंद झाले होते. त्यांना एक अशी बंदूक हवी होती जी कमी खर्चा बनले ज्यामुळं मोठ्या संख्येत त्यांच उत्पादन घेता येईल. आणि कमी कालावधीत बनले ज्यामुळं पुन्हा युद्धभूमित ताकदीनं उतरता येईल. अशात एक दमदार सब मशिन गन बनवण्याची तयारी ब्रिटनमध्ये सुरु झाली. जर्मनीच्या एम.पी.३८ बंदुकीच्या धरतीवर ते मॉडेल विकसती झालं. या बंदुकीचं एक स्वस्त मॉडेल बनवण्यावर प्रयत्न सुरु झाले. उपलब्ध स्टीलला वेल्डींग करुन बंदूक बनवण्यात आली. दिसायला एम. पी. ३८ सारखी असली तरी त्याहून अनेक पट चांगली बंदूक बनून तयार होती. ९ एम.एम. ची गोळी बंदुकीत वापरण शक्य होतं. पिस्तूलीच्या गोळ्याही या बंदूकीत बसाव्यात असं डिझाईन बनवण्यात आलं. १९४१ पर्यंत इंग्लंडच्या सैन्याच्या हातात ‘स्टेन गन’ देण्यात आली. स्टेन गन इतर बंदुकींच्या मानानं बरीच हलकी आणि प्रभावी होती. तिला सोबत घेऊन चालनं खुप सोप्प होतं.

स्टेन गन समोर जर्मनीनं टाकली नांगी

ब्रिटन सैन्याच्या हातात स्टेन गन आली आणि त्यांनी शत्रुला तोडीस तोड उत्तर दिलं. ही बंदूक बनवायला फक्त १० डॉलर्सचा खर्च यायचा. तुलनेत अमेरिकेकडून विकत घेतलेल्या एम १ ए १ गन ची किंमत २०० डॉलर होती. म्हणजे तब्बल २० पट किंमतीची बचत या गनने केली. फक्त चार किलो वजनाची ही गन एका मिनीटात ५०० गोळ्या फायर करु शकत होती. इंग्लंडच्या सैन्यानंतर आता संपुर्ण युरोपीय राष्ट्रांच्या सैन्याच्या हातात स्टेन गन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जस जशी स्टेन गन युरोपभर पोहचली जर्मनीची पिछेहाट सुरु झाली. अजिंक्य मानल्या जाणाऱ्या जर्मन सैन्याला नांगी टाकायला या बंदूकीनं भाग पाडलं.

दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडनं स्टेन गन विकुन भरपुर पैसा कमावला. १९४५ ला दुसरं महायुद्ध संपलं. हे युद्धा दरम्यान पन्नास लाख स्टेन गनची विक्री इंग्लंडनं केली होती. जर्मनी सैन्याला सुद्धा या स्टेनगनची क्षमता लक्षात आली त्यांनी ही गन वापरायला सुरुवात केली परंतू खुप वेळ झाला होता. स्टेन गननं दुसऱ्या महायुद्धाची दिशा बदलली होती. ज्यावेळी पराभवाशिवाय इंग्लंड समोर कोणताच पर्याय नव्हता तेव्हा या गननं एक उमेद सैन्याच्या मनात निर्माण केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button