हिमवृष्टीत आणि कमी विमान असतानाही ब्रिटीश हवाई दलानं नाझी सैन्याचा धुव्वा उडवला होता!

Maharashtra Today

१८ फेब्रुवारी १९४४ च्या सकाळी जबरदस्त हिमवर्षावाला सुरुवात झाली होती. तुरुंगातल्या नाझी कैद्यांना कल्पनाच नव्हती. तो दिवस त्यांच्यासाठी किती भयानक ठरणार होता. तितक्यात त्यांना आकाशात विमानांचा ताफा दिसला. काही सेकंदातच विमानांनी तुरुंगाच्या इमारतीवर बॉम्ब फेकायला सुरुवात केली. काही कळायच्या आत विस्फोटांना सुरुवात झाली. सर्व काही राखेत बदललं होतं. ब्रिटनच्या हवाई दलानं फ्रांसमधल्या तुरुंगात अडकलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी हे कारवाई केली होती. इतिहासात ‘ऑपरेशन जेरोको'(Operation Jereko) अशी या ऑपरेशनची नोंद घेण्यात आलीये.

७०० निष्पाप कैद्यांवर होती टांगती तलवार

दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत असणाऱ्या जर्मनीच्या ‘नाझी’ सैन्यानं (Nazi army) पटापट शेजारील राष्ट्र जिंकायला सुरुवात केली. यात फ्रांसही होतं. फ्रांसचा मोठा हिस्सा जर्मनीनं जिंकला होता. इतकंच नाही तर तिथल्या तुरुंगांनावर देखील ताबा मिळवला होता. या तुरुंगांचा वापर नाझी सैन्य विरोधात बोलणाऱ्या फ्रांसच्या नागरिकांना डांबून ठेवण्यासाठी करायचं. थोड्या दिवसांच्या अंतरांनी अनेक कैद्यांची हत्या नाझी सैन्यांन केली होती. १९ फेब्रुवारी १९४४ साली, तुरुंगातील १०० कैद्यांना जीवे मारण्याचं त्यांनी नियोजन केलं होतं. ब्रिटीशांच्या गुप्हेर विभागाला याची भनक लागली होती.

त्यांना खबर मिळाली की तुरुंगात ७०० कैदी आहेत. या कैद्यांना जीवे मारण्याच्या पुर्ण प्लॅन नाझी सैन्यानं केलाय. अनेकांचा जीव धोक्यात होता. कैद्यांचा जीव वाचावा म्हणून काहीतरी करण्याच्या प्रयत्नात ब्रिटन सेना होती. काही तुरुंग असे होते ज्यावर जमिनीवरुन हल्ला करणं शक्य नव्हतं. हल्ला यशस्वी होण्यासाठी हवाई दलांनंच पुढाकर घेणं गरजेचं होतं. ब्रिटीशांच्या ‘रॉयल एअर फोर्स’नं जबाबदारी स्वीकारली. नाझी सैन्याच्या नाकाखालून कैद्यांची सुटका करायची होती. हे काम मोठ्या जिकरीचं होतं.

विमानांना तयार करण्यात आलं

हवाई हल्ला होईल हे निश्चित झालं होतं. मिशनसाठी प्लॅनही बनून तयार होता. आता लढाऊ विमानांनी कामगिरी फत्तेह करायची होती. यासाठी कोणती विमानं वापरावीत हा प्रश्न होता. वैमानिकांची बैठक बोलवण्यात आली. अनेक तास सलग ही बैठक चालल्यानंतर प्लॅन तयार झाला.

प्लॅननूसार लहान आणि वेगवान लढाऊ विमानांनी तुरुंगावर हल्ला करायचा होता. नाझी सैन्याच्या छावण्या आणि तुरुंगाच्या भिंती फक्त उध्वस्त करायच्या होत्या. यासाठी ब्रिटीशांनी ‘मॉस्किटो’ विमानांचा वापर करण्याचं ठरवलं. ही विमानं आकारनं लहान होती पण बॉम्ब फेक करण्यासाठी सर्वोत्कृष्ठ. वैमानिकांच्या तुकडीवर मोहिम सोपवण्यात आली. यासाठी १८ वैमानिकांची निवड करण्यात आली. नाझी सैन्यांच्या मोठ्या तुकडीचा खात्मा करण्याचं दिव्य वैमानिकांच्या तुकडीला पार पाडायचं होतं.

खराब हवामानामुळं अडचणींमध्ये वाढ झाली. वारंवार मोहीम पुढं ढकलावी लागली. युरोपात बर्फवृष्टीला सुरुवात झाली होती. खराब हवामानामुळं विमानं दुर्घटनाग्रस्त होतील अशी भिती सर्वांना होती. १७ फेब्रुवारी उजडली तरी हवामानात काही बदल जाणवत नव्हता. शेवटी कोणत्याही परिस्थीतीत १८ फेब्रुवारीच्या सकाळी हल्ला करायचाच हे निश्चीत झालं. रात्रीपासूनच सारे वैमानिक तयार होते. सकाळच्या पहिल्या किरणासोबत त्यांनी आवकाशात झेप घेतली.

नाझींवर तुफान बॉम्बफेक

बर्फवृष्टी मोठ्याप्रमाणात असतानासुद्ध अडचणीतून वाट काढत फक्त ८ विमानांनी फ्रान्सचं तुरुंग गाठलं. उरलेल्यातल्या काहींना उड्डाण करता आलं नाही तर काहीजण रस्ता भटकले होते. नाझी सैन्यांच्या लक्षात काही प्रकार यायच्या आत बॉम्बचा तुफान मारा करण्यात आला. तुरुंगाच्या भिंती ढासळल्या. कैद्यांना मार्ग दिसताच त्यांनी बाहेर धुम ठोकली. कैद्यांच्या लक्षात आलं की ही बॉम्ब फेक त्यांच्या बचावासाठी होती. तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांना रोखण्याच्या नाझी सैनिकांनी अयशस्वी प्रयत्न केला. नंतर गोळ्या झाडल्या. यात काही कैदे मरण पावले पण अधिकांश कैद्यांची सुटका झाली. ब्रिटीशांच्या वायु दलानं अशक्य वाटणारी मोहीम शक्य करुन दाखवली होती.

ब्रिटीश वैमानिकांचे हात ही रक्ताने माखले होते

१८ फेब्रुवारीपर्यंत ब्रिटीशांच्या वायु सैन्याची मोहीम फत्ते झाली म्हणून जल्लोष झाला. नंतर जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सारेच हैराण होते. वैमानिकांनी कैद्यांना मुक्त केलं पण याच बॉम्ब हल्ल्यात अनेक कैद्यांना जीव गमवावा लगला. तुरुंगातील ७१७ कैद्यांना मुक्त करण्यासाठी ही मोहिम आखली गेली. पैकी २५८ कैद्यांना वाचवण्यात यश आलं. ७४ कैदी बॉम्ब हल्ल्यात भयानक जखमी झाले तर १०२ कैद्यांचा मृत्यू झाला.

मृत कैद्यांना फक्त बॉम्ब हल्ल्यामुळं जीव गमवावा लागला नव्हता.काही कैद्यांना नाझी सैन्यानंही जीवे मारलं होतं. असं असताना सुद्धा ऑपरेशन जेरेको यशस्वी मानलं गेलं कारण खराब हवामान आणि प्रतिकुल परिस्थीतीवर मात करुन ब्रिटनच्या पराक्रमी वैमानिकांनी अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button