वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळला; ४ ठार, २२ जखमी

Accident

रायगड : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक (Truck) ३०० फूट खोल दरीत कोसळला. प्राथमिक माहितीनुसार चार जण जागीच ठार झालेत व २२ जखमी आहेत. मदतकार्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडीजवळील वळणावर हा अपघात झाला. या ट्रकमध्ये २५ जण होते, अशी माहिती आहे. वळणावर चालकाचे  नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच महाड येथून जवान मदतकार्यासाठी रवाना झाले आहेत.

महाडची रेस्क्यू टीमही घटनास्थळाकडे निघाली होती. काल महाड तालुक्यात आकले गावाजवळ वऱ्हाडाची बस उलटली होती.  त्या अपघातात १५ जण जखमी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER