पुर्वीच्या गझनी शहराचं रावळपिंडी नाव होण्यामागं ‘या’ भारतीय योद्ध्याचं शौर्य दडलेलं आहे!

Maharashtra Today

पर्वतं, जंगली रस्ते आणि वाळवंटानी वेढलेला मेवाड प्रांत कधी कुंभा, राणा सांगा आणि महाराणा प्रतापांच्या(Maharana Pratap) शक्तीशाली व प्रतापी राजांचा प्रांत होता. ‘गुहिल वंशानं'(Guhil dynasty) मेवाड राज्याची स्थापना इसन ५६८मध्ये केली होती. गुहिल वंश जो नंतरच्या काळात ‘गेहलोत’ बनला आणि गेहलोतचा ‘सिसोदिया’ वंश. इतिहासानूसार ८ व्या शतकात मेवाड साम्राज्याची सुरुवात ‘बप्पा’ रावल यांनी केल्याचा उल्लेख आहे. मेवाडचा संस्थापक पिता म्हणून त्यांचा उल्लेख आहे. त्यांचं खरं नाव होतं ‘कालभोॉज.'(kalbhauj) प्रजेवर मनापासून प्रेम करत असल्यामुळं संपूर्ण प्रजेनंच त्यांच नामकरण बप्पा असं केलं होतं.

वर्तमानात पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडी शहराचं नाव बप्पा रावल यांच्या नावावरुनच दिल्याची मान्यता आहे. मेवाडवर शासन करणारे बप्पा रावल सिंधपर्यंत कसे पोहचले आणि रावळपिंडी शहर कसं वसलं याची कहाणी

अरबांचं आक्रमण

गुहिल वंशाचे ‘नागादित्य’ यांची ७२७ मध्ये हत्या भिल्लांनी हत्या केल्याची नोंद इतिहासात आहे. हा तो काळ होता जेव्हा भारतावर अरबांच्या आक्रमणाची तयारी सुरु होती. अरबच्या शासकांनी लुटीला सुरुवात केली होतीय स्पेन. इराण आणि इजिप्त देशांना लुटलं होतं. आखाती देशात प्राबल्य वाढवलं होतं. या दरम्यान इराकचा शासक ‘अल हज्जाज’ची नजर ऐश्वर्य संपन्न भारतावर पडली. त्यानं अनेकदा भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ‘मोहम्मद बिन कासिम’ यांन ७१२ मध्ये खलिफाच्या मदतीनं भारताच्या उत्तरेतील सीमेवर आक्रमण केलं. तेव्हा तिथले राजा होते ‘दाहर सेन’ सींधू राज्याची सीमा उत्तरप्रदेशच्या कन्नोजपासून ते अफगाणिस्तानच्या कंधारपर्यंत होती. काश्मिरपासून गुजरातच्या वाळवंटापर्यंत हे साम्राज्य परसलं होतं.

अनेकदा मोहम्मद बिन कासीमनं आक्रमण केलं पण दाहर सेननं त्यांचा पराभव केला. शेवटी स्त्रीयांच्या वेशात मोहम्मद बीन कासिम यांच्या सैन्यानं आक्रमण केलं. या लढाईत राजा दाहर सेन याचा मृत्यू झाला. अरबांनी सिंध मार्गे राजस्थान, गुजरातमध्ये साम्राज्य विस्तार केला.

चित्तोडमधून अरबांना हकललं

भारतातील सर्वच साम्राज्यांनी अरबांपुढं गुडघे टेकली तरी अरबांचा सामना अजून बप्पा रावल यांच्याशी होणं बाकी होतं. नागादित्यचा मुलगा आणि मेवाडचा राजा बप्पा रावल यांनी अरबांचा समाचार घ्यायचं ठरवलं. बप्पा रावल यांनी अरबांचा सामना करायला विशाल फौज एकत्र केली. अरब आणि बप्पा रावल यांच सैन्य भिडलं. त्यांनी अरबांच्या सैन्याला सळो की पळो करुन सोडलं. बप्पा रावल यांचा शासन काळ सन ७३४ ते सन ७५३ पर्यंत होता.

रावळपिंडीत उभारली छावणी

अरबांनी चित्तोडवर आक्रमण केलं तेव्हा त्यावर मौर्याचं शासन होतं. अरबांच्या आक्रमणामुळं मौर्य कमजोर झाले होते. नंतर मौर्यांच्या पराभवानंतर चित्तोड प्रांत अरबांनी जिंकला. अरबांच्या तावडीतून बप्पा रावल यांनी चित्तोडगड सोडवला. पुढं अरबांना अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत हकललं. रावळपिंडीत अरबांच्या सैन्याला रोखण्यासाठी बप्पा रावल यांनी सैन्य छावणी उभारली. याच्या आधी हे शहर गझनी या नावानं ओळखलं जायचं. पुढं या चौकीचं रुपांतर मोठ्या शहरात झालं आणि या शहराला बप्पा रावल यांच्या नावावरुन रावळपिंडी हे नाव देण्यात आलं. इतर राज्यांशी हात मिळवणी करुन बप्पा रावल यांनी पुढची १६ वर्ष अरबांशी लढा दिला. भारताच्या पावन भूमीपासून परकिय आक्रमणकारी ताकदींना त्यांनी दुर ठेवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button