बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशतवादी भरले आहेत; कंगनाचा सनसनाटी आरोप

Kangana Ranaut - Taapsee Pannu - Anurag Kashyap

मुंबई :- अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली. यावर प्रतिक्रिया देतांना अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) – मला पहिल्यापासूनच माहीत होत ही मंडळी देशविरोधी कृत्य करत आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशतवादी भरले आहेत, असा आरोप करीन खळबळ उडवून दिली.

कंगनाचे ट्विट

कंगनाने ट्विट केले – ही मंडळी जेव्हा राष्ट्रविरोधी जाहिराती करुन मजुरांना भडकवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हाच कळले होते काही तरी गडबड आहे. माहिती परत घेतली जाऊ शकते परंतु हे लहान मासे आहेत. बॉलिवूड (Bollywood) फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशतवादी भरले आहेत. ही मंडळी आपल्या पैशांचा वापर करुन भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने अशा लोकांना चांगलाच धडा शिकवायला हवा.” अशा आशयाची दोन ट्विट्स करुन कंगनानं अनुराग आणि तापसीवर जोरदार टीका केली. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेते आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मुंबईतील सुमारे २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून सुरू आहे. फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या. कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली, असे आयकर विभागाने म्हटले आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचे वितरण काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी २०११ मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी २०१८ मध्ये बंद केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER