कोल्हापुरात दोन बहिणींचे मृतदेह आढळले

bodies of two sisters were found

कोल्हापूर :- जैनापूर (ता.शिरोळ) येथील हनुमान नगरात राहणाऱ्या सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळल्याचे एकच खळबळ उडाली. या दोघी बहिणी शनिवार (दि.20) मध्यरात्रीपासून बेपत्ता होत्या. दानोळी रस्त्यावरील एका शेतातील विहिरीत या दोन बहिणींचा आज, सोमवारी मृतदेह आढळला. प्रियांका बाबासाहेब चौगुले (वय 25, रा.बेघर वसाहत, नांदणी) व राजनंदिनी राजेंद्र उपाध्ये (वय 16, रा. हनुमाननगर) अशी या दोघींची नावे आहेत.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, मृतातील एक बहिण विवाहित असून दुसरी अल्पवयीन आहे. त्यांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रियंकाला दोन मुले असून राजनंदिनीचा साखरपुडा झाल्याचे समजते. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन विहिरीतील मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हील रूग्णालयात पाठविण्यात आले.

राजेंद्र व सुमन उपाध्ये यांना स्वाती, प्रियांका, अक्षता व राजनंदिनी अशा चार मुली व मुलगा राहुल अशी पाच मुले आहेत. राजेंद्र उपाध्ये हे पूजा, वास्तुशास्त्र कुंडली काढण्याबरोबरच जयसिंगपूर येथे सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करतात. यापूर्वी हे कुटूंब जयसिंगपूर येथे राजीव गांधीनगरातील रहात होते. गेल्या दीड-दोन वर्षापूर्वी हे कुटुंब जैनापूर हनुमाननगरात राहत होते. राजेंद्र यांच्या प्रियांका व राजनंदिनी ह्या दोघी मुली शनिवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता होत्या.

ही बातमी पण वाचा : इमारतींसाठी करवीर पंचायतीचे काम बंद आंदोलन