वचक गुन्हेगारांवर हवा, जनतेवर नको; अजित पवारांचा पोलिसांना टोमणा

Ajit Pawar

पिंपरी-चिंचवड : नागरिक पोलिसांकडे विश्‍वासाने आले पाहिजेत आणि समाधानी घेऊन गेले पाहिजेत. पोलिसांचा वचक जनतेवर नको तर गुन्हेगारांवर हवा, असा टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) यांनी पोलिसांना मारला.

ते पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सेवा, एक्‍स ट्रॅकर उपक्रम कार्यक्रमाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना योग्य वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यावर मार्ग काढून पोलिसांच्या कामात तत्परता आणण्यासाठी हा सेवा उपक्रम राबविला जातो आहे. त्यात ठाण्यात आलेल्या नागरिकांची माहिती ऑनलाइन नियंत्रण कक्षात पाठवली जाणार आहे. नागरिकांना पोलिसांकडून मिळालेल्या सेवेचा फॉलोअप नियंत्रण कक्षातून घेतला जाणार आहे .

पिंपरी चिंचवड पोलीस सराईत गुन्हेगारांवर ‘स्मार्ट’ पद्धतीने लक्ष ठेवणार आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ‘एक्‍स ट्रॅकर’ हे नवीन ऍप्लिकेशन तयार केले आहे. तडीपार केलेल्या गुन्हेगारांना त्यांचे रोजचे अपडेट या ऍप्लिकेशनने पोलिसांना द्यावे लागणार आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोशल मिडियाचा वापर वाढवला आहे. त्यासाठी फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम, युट्यूब ही सोशल मीडिया पेजेस नव्याने सुरू करण्यात आली आहेत.

ही बातमी पण वाचा : वीज बिल ५० टक्के माफ केले! अजित पवारांचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER