निवडणुकीत भाजपाला दोन अंकी आकडाही गाठता येणार नाही; प्रशांत किशोर यांचा दावा

prashant-kishor

कोलकाता :- पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या नेत्यांच्या सभांना प्रचंड जनसमर्थन मिळते आहे. त्यावरून विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळेल, असा अंदाज सर्वत्र व्यक्त होतो आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत भूषण यांनी निवडणुकीत भाजपाला (BJP) दोन अंकी आकडाही गाठता येणार नाही, असा दावा केला आहे ! प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी ट्विट केले आहे – माध्यमातील एक वर्ग भाजपाच्या समर्थनार्थ वातावरण तयार करतो आहे.

यातून हे स्पष्ट होते की, भाजपा दोन अंकी संख्या पार करण्यासाठीही धडपडते आहे. माझे आव्हान आहे, हे ट्विट जपून करून ठेवा; भाजपाने चांगले प्रदर्शन केले तर मी ट्विटर सोडून देईन. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापून राहिले आहे.

बंगाल काबीज करण्यासाठी भाजपाने शक्ती पणाला लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी स्वतः पश्चिम बंगाल निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यामुळे भाजपाला या निवडणुकीत चांगले यश मिळू शकते, असा अंदाज लावला जातो आहे. भाजपाने मिशन बंगाल लक्ष्य ठेवून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आव्हान देणे सुरू केले आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा बराच गाजला. पहिल्या दिवशी भाजपात महाभरती झाली तर दुसऱ्या दिवशी प्रचंड मोठी रॅली शहा यांनी केली.

देशाला एक रणनीतिकार गमवावा लागेल

प्रशांत किशोर यांच्या या ट्विटला भाजपाने प्रत्युत्तर दिले. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करून टोमणा मारला – पश्चिम बंगालमध्ये भाजपाची त्सुनामी आली आहे. सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाला एक रणनीतिकार गमवावा लागेल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER