नगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार, अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत येण्याचा दावा

NCP & BJP

अहमदनगर : भाजपला (BJP) रामराम ठोकून जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर भाजपमधून मोठ्याप्रमाणात आऊटगोईंग तर राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात झाली आहे. आता अहमदनगरमध्येही (Ahmednagar) भाजप कार्यकर्त्यांची नाराजी समोर आली आहे. ‘पुढील काळामध्ये भाजपातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून ते लवकरच राष्ट्रवादीमध्येप्रवेश करतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केला आहे.

भाजपकडून हे सरकार लवकरच कोसळेल असा दावा केला जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पाच वर्ष पूर्ण करणार यात कुठलीही शंका नाही. पाच वर्ष चांगल्या प्रकारे पूर्ण होतील यामुळेच त्याच्या पुढली पाच वर्ष सुद्धा आमचंच सरकार असेल, असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर, अहमदनगर जिल्ह्यात भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे काही दिवसात भाजपातील अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा दावाही तनपुरे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER