भाजपाला शेतकरी पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू वाटतो; काँग्रेसची टीका

BJP sees farmers

सांगली : भाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येतो आहे. पाकिस्तानपेक्षा भजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

ते म्हणालेत, केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणा राज्य पेटून उठली आहेत. तिथे आजही आंदोलन सुरु आहेत. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना या कायद्यांचा चिमटा बसला नाही मात्र धोका कायम आहे. ते सांगलीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनात ते बोलत होते.

शिल्लक साखरेचा प्रश्न गंभीर असताना निर्यात बंदी केली. याचा अर्थ शेतकऱ्यांची जिरवायची आहे. कांदा आयात करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची चर्चा आहे. म्हणजेच आज देशातील भाजपा सरकारला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा त्यांचा मोठा शत्रू वाटतो आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

दुधाची भुकटीही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तरीही मोदी सरकार परदेशातून पावडर आयात करण्याचा निर्णय घेते. दुधाचे भाव न वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. अशात कृषी कायदे आणले आहेत त्यामुळेच काँग्रेस या कायद्यांविरोधात आवाज उठवला आहे, असे ते म्हणाले.

ट्रम्प यांच्या पराभवाच्या शक्यतेवरुन भाजपवर टीका

डोनाल्ड ट्रम्प यांनी काळा-गोरा असा भेद केला, तणाव निर्माण करुन मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण जो जनतेत भेद निर्माण करतो त्याचा पराभव होतो. हे आता जगातले नव चक्र आहे. भेदभावाचे राजकारण करता येणार नाही हे सांगणारा निर्णय अमेरिकेत होतो आहे, असाच निर्णय भारतातही झाल्याशिवाय राहणार नाही असे थोरात म्हणाले.

केंद्र सरकार मूठभर लोकांसाठी काम करते आहे. केंद्र सरकारला धर्माचे नाव घेऊन भेदभाव करायचा आणि आपली पोळी भाजायची आहे. जनता काही बोलत नाही. मात्र आता हे धोरण चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER