‘भाजप अगदी दूध के धुले आहेत !’ पेडणेकरांचा टोला

kishori pednekar - Maharastra Today
kishori pednekar - Maharastra Today

मुंबई : मालाडमध्ये इमारत कोसळून दुर्घटना झाल्याने भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. ‘भाजपला भौ-भौ करत राहू दे. ते अगदी दूध के धुले आहेत.’ अशी बोचरी टीका त्यांनी केली.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालाडमध्ये झालेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. भाजपकडून होत असलेल्या आरोपांबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले. यावर ते म्हणाले की, “भाजपचं काय ते भौ भौ करायचं काम करते, ते त्यांना करत राहू दे. कारण शिवसेना हे करते ते करते असे ते सांगतात. ते अगदी दूध के धुले आहेत नो प्रॉब्लेम. मुंबईत पाणी भरलं रे भरलं की विरोधकांच्या अंगात वारं भरतं.” अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

कोरोनामध्ये बऱ्याच ठिकाणी अनधिकृत कामे झाली. याबाबत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांकडेही या बांधकामांविषयी मीटिंग झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भूखंडावर आणि बीपीटीच्या भूखंडावरही अनधिकृत बांधकाम झाले आहे. यासाठी येत्या मंगळवारी आढावा घेऊन त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करत कारवाई करण्यासाठी आमचे अधिकारी आहेत. कोरोनामुळे कारवाई करू नका, असे सांगण्यात येते. यावर ठोस निर्णय घ्यावा लागेल, असेही पेडणेकर म्हणाल्या.

११ जणांचा मृत्यू
मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळल्याने ११ जण दगावले. तर ७ जण जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या दुर्घटनास्थळी महापालिका आणि अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button