भाजपाचे ठरले : ओबीसी आणि युवांच्या भरोशावर सत्तेत येऊ

BJP Flags

मुंबई :- हे सरकार फार काळ टिकणार नाही आणि आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा दावा भाजपा करते. मुंबईजवळच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पक्षाच्या ‘योजना बैठकी’त ओबीसी आणि युवांना पक्षाशी जोडून सत्तेत येऊ, असे ठरवण्यात आले.

ओबीसी समाजापर्यंत पोहचणे आणि राज्यातील युवा शक्तीला आपल्याकडे खेचून घेणे यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘ओबीसी हक्क परिषद’ घेणार व युवकांसाठी कार्यक्रम आयोजित करू, अशी माहिती पक्षाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना दिली.

गेल्या काही काळापासून ओबीसी समाज भाजपापासून दुरावला आहे, अशी चर्चा आहे. ओबीसी नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षातील राज्यातील नेत्यांवर नाराज असल्याचीही चर्चा होत असते. त्यामुळे भाजपाने ही आरक्षण हक्क परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने जे निर्णय घेतले त्याशिवाय या सरकारने काहीही केलेले नाही, असे शेलार म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल युवावर्गात मोठे आकर्षण आहे. अधिकाधिक युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी भाजपा ‘युवा वॉरियर’ अभियान सुरू करणार आहे.

यात राज्यातील कानाकोपऱ्यातल्या युवावर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपा करणार आहे. या बैठकीत भाजपाच्या केंद्रीय संघटनमंत्र्यांसह जवळपास ४० नेते हजर होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुधाकर भालेराव, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांचा  यात समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER