केंद्रातील भाजप सरकार हे तर सूट बूट वाल्यांचे सरकार : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कोल्हापूर : मोदी सरकारने (Modi Government) घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे. हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे सरकार नसून हे सुटबूटवाल्यांचे सरकार आहे अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी कोल्हापूर (Kolhapur) येथील डिजिटल रॅलीमधून केली. काँग्रेस (Congress) पक्षाकडून ही डिजिटल रॅली महाराष्ट्रातील सहा प्रमुख शहरांतून आयोजित केली होती.

या प्रसंगी राज्यातील सहा प्रमुख शहरांतून या डिजिटल रॅली प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), राज्याचे माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत, आदिवासी विकास मंत्री के. सी.  पाडवी, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम आदी नेत्यांची भाषणे राज्यातील मुंबई, संगमनेर, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद या सहा प्रमुख शहरांतून  झाली. या प्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करून घेत लोकशाहीचा गळा घोटला आहे.

हे शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे विधेयक असून मोदींच्या कॉर्पोरेट मित्रांनाच याचा फायदा होणार आहे. हे कृषी विधेयक संशोधनासाठी संसदीय समितीकडे पाठवावे असा आमचा आग्रह होता. किमानपक्षी भाजपाने (BJP) आपला मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाशी याबाबत चर्चा करायला हवी होती.  मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करायला हवी होती; पण त्यांनी तेही केले नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असं मोदी म्हणाले होते; पण शेतकऱ्यांना सध्या हमीभावही मिळत नाही. हा काळा कायदा पुन्हा सरकारला पाठवून फेरविचार करायची मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकार मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER