शेतकरी आंदोलनात सर्वात मोठे चेहरे ; पवार-ठाकरे मैदानात, थोरातही सोबतीला

Sharad Pawar - Aaditya Thackeray - Balasaheb Thorat

मुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. कृषी कायदे मागे घेण्याची मुख्य मागणी त्यांनी केली आहे. या मोर्चाला काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेने (Shiv Sena) जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासाठी आजच्या (25 जानेवारी) मोर्चात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) सहभागी होणार आहेत.

मुंबई येथील आझाद मैदानावर सुरु असलेल्या मोर्चात शरद पवार दुपारी 1 वाजता सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे हे बहुमताच्या जोरावर मंजूर केले आहेत. कोणताही कायदा मंजूर करण्यासाठी योग्य चर्चा होणे गरजेचे असते. मात्र, चर्चा न करताच हे कायदे मंजूर करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची बाजू समजून घेणे गरजेचे होते. पण सरकारने तेही केले नाही. त्यामुळेच हे वादंग माजले आहे, असे शरद पवार म्हणाले.

तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे घटनात्मक पदावार असणारे व्यक्ती आहेत. त्यांनी या मोर्चात सहभागी होऊ नये असे वैयक्तिक मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

आझाद मैदान येथे सुरु असलेल्या मोर्चात आदित्य ठाकरे हेसुद्धा सहभागी होणार आहेत. आंदोलनस्थळी येऊन ते शेतकऱ्यांची भेट घेतील. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरेंना पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER