मोठी बातमी : अनलॉक 5 मध्ये शाळा आणि चित्रपट गृहे सुरू करणार मात्र,… ; केंद्राच्या गाइडलाईन्स जारी

Unlock 5.0

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मागील सात ते आठ महिन्यापासून संपुर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. पहिले तीन महिने कडक लॉकडाऊन नंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन (Lockdown) शिथील करण्यात येत आहे. अनलॉकचा हा आता पाचवा टप्पा आहे.

केंद्र सरकारनं अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृह व शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली, तरी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांकडे सोपवला आहे.

तसेच, पाचव्या टप्प्यात चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स, थिअटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देता येईल. प्रेक्षकांना बसवण्यासंदर्भातील नियमावली माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येईल, असं केंद्रानं म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात ५० टक्के शिक्षकांना शाळेत बोलवण्यास परवानगी दिली होती. पाचव्या टप्प्यात १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, संबंधित राज्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, असं मार्गदर्शन सूचनांमध्ये म्हटलं आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारं सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासही केंद्रानं संमती दिली आहे. मात्र, अशा कार्यक्रमांना १०० व्यक्तीची मर्यादा घालण्यात आलेली आहे. सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना केंद्रानं अगोदरच परवानगी दिली आहे. मात्र, हे कार्यक्रम कंटेनमेंट झोनमध्ये आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. खेळाडूंसाठी स्वीमिंग पूल सुरू करण्यासही केंद्रानं परवानगी दिली आहे. केंद्रीय क्रीडा व युवा मंत्रालयानं जाहीर केलेल्या नियमावलीचं पालन करण्यात यावं, असे निर्देश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER