मार्चपासून प्रत्येक शुक्रवारी रिलीज होणार मोठा सिनेमा

Upcoming Movies in 2021

2020 ची पहिली तिमाही म्हणजेच जानेवारी ते मार्च सोडल्यास नंतर 2021 च्या फेब्रुवारीपर्यंत एकही मोठा सिनेमा रिलीज झाला नाही. कोरोनामुळे अनेक सिनेमांचे शूटिंग पूर्ण होऊ न शकल्याने सिनेमे रिलीज होऊ शकले नाहीत. एवढेच नव्हे तर संपूर्णपणे तयार असलेले अनेक मोठे सिनेमेही रिलीज होऊ शकले नाहीत. मात्र 2020 च्या शेवटच्या महिन्यापासून अपूर्ण राहिलेल्या सिनेमांचे शूटिंग सुरु करण्यात आले. त्यामुळे आगामी काही महिन्यातच हे सर्व सिनेमे प्रदर्शनासाठी तयार होणार आहेत. त्यातच काही तयार असलेले मोठे सिनेमेही यावर्षी रिलीज केले जाणार आहेत. बॉलिवूडमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2021 पर्यंत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रणवीर सिंह (Ranveer Singh), कंगना रनौत (Kangana Ranaut), आलिया भट्ट (Alia Bhatt), अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान (Salman Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), शाहरुख खान (Shahrukh Khan), आमिर खान (Aamir Khan) यांचे जवळजवळ 40 मोठे सिनेमे रिलीज केले जाणार आहेत. याचाच अर्थ प्रत्येक शुक्रवारी एक मोठा सिनेमा रिलीज होण्याची लक्षणे दिसत आहेत. सिनेमाच्या तिकिटाचे दर 300 ते 500 रुपये असल्याने बॉक्स ऑफिसवर हे सिनेमे कोट्यावधींच्या उड्या मारू शकतील का असा प्रश्न बॉलिवूडमध्येच विचारला जाऊ लागला आहे. तरी यात हॉलिवूड आणि साऊथच्या सिनेमांचा समावेश नाही. हे सिनेमे जर यात जोडले तर महिन्याला सात ते आठ मोठे नवे सिनेमे रिलीज होऊ शकतात. कोणते आहेत हे मोठे सिनेमे. पाहूयात-

बॉक्स ऑफिसवर हमखास यश मिळवून देणारा अभिनेता म्हणून अक्षयकुमारकडे पाहिले जाते. यावर्षी त्याचे 7 सिनेमे रिलीज होणार आहेत. सूर्यवंशी, रक्षाबंधन, बेलबॉटम, पृथ्वीराज, अतरंगी रे, रामसेतु आणि बच्चन पांडे हे अक्षयचे सात सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहेत.

अजय देवगणचेही (Ajay Devgan) चार सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहेत. ‘भुज-द प्राइड ऑफ इंडिया’ सिनेमाने याची सुरुवात होणार असून त्यानंतर नॅशनल फुटबॉल टीमचा कोच आणि मॅनेजर असलेल्या सईद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित ‘मैदान’ रिलीज होणार आहे. अजय देवगण द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित मे डे हा सिनेमासुद्धा यावर्षी रिलीज केला जाणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन यांचीही महत्वाची भूमिका आहे. यासोबतच एसएस राजामौलीचे दिग्दर्शन असलेला बहुचर्चित मल्टीस्टारर ‘आरआरआर’ रिलीज होणार आहे. यात अजय देवगणसोबत राम चरण, एनटीआर आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका आहेत.

ऋतिक रोशन (Hritik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) प्रथमच ‘फायटर’ (Fighter) मधून एकत्र येत असून सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा अॅक्शन पॅक्ड देशभक्तीने भरलेला सिनेमा यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

रणबीर कपूरचेही तीन सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहेत. ज्यांच्या लग्नाची उत्सुकता आणि चर्चा बॉलिवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे ते आलिया भट्ट आणि रणबीर कपूर प्रथमच यावर्षी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. करण जोहरच्या ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये हे दोघे एकत्र काम करीत आहेत. त्यानंतर रणबीरचे ‘शमशेरा’ आणि लव रंजन दिग्दर्शित एक सिनेमाही यावर्षी रिलीज होणार आहे.

अॅक्शन स्टार टायगर श्रॉफचेही (Tiger Shroff) तीन सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहेत. हे सिनेमे आहेत ‘हीरोपंती 2’, ‘बाघी 4’ आणि ‘गणपत’. सैफ अली खानचे ‘बंटी और बबली-2’ आणि ‘भूत पोलीस’ हे सिनेमे रिलीज होणार आहेत तर सलमान खानचेही ‘राधे- द मोस्ट वाँटेड भाई’, ‘अंतिम’ आणि ‘कभी ईद, कभी दिवाली’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. आमिर खानची निर्मिती असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ही यावर्षी रिलीज होणार आहे. यात आमिरसोबत करीना कपूर नायिकेच्या रुपात दिसणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा सिनेमा हॉलीवूडच्या सुपरहिट पुरस्कार विजेता सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प‘ची हिंदी रिमेक आहे.

रणवीर सिंहचे ‘83’ (दिग्दर्शन कबीर खान), ‘जयेशभाई जोरदार’ (दिग्दर्शक दिव्यांग ठक्कर आणि ‘सर्कस’ (दिग्दर्शक रोहित शेट्टी) हे तीन सिनेमे रिलीज होणार आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’ही यावर्षी रिलीज केला जाणार असून तीन वर्षानंतर शाहरुख या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित फरहान अख्तर अभिनीत ‘तूफान’ हा सिनेमा यावर्षी रिलीड होणार आहे. सुपरस्टार यशचा केजीएफचा भाग 2 ‘केजीएफ चॅप्टर 2’ सुद्धा यावर्षी रिलीज होणार असून यात संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. कार्तिक आर्यनचे ‘भूल भुलैया-2’ आणि ‘दोस्ताना-2’ हे सिनेमे रिलीज होणार आहेत. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरचा बधाई दो’सुद्धा यावर्षी रिलीज होणार आहे.

या मोठ्या नायकांसोबतच कंगनाचे तीन मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. यापैकी एक आहे तामिळनाडूच्या स्वर्गीय मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावरील ‘थलाईवा’ आणि दुसरा सिनेमा ‘तेजस’ असून तिसरा सिनेमा आहे अॅक्शनपॅक्ड ‘धाकड’. कॅटरीना कैफचा ‘फोन भूत’ रिलीज होणार असून तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ही यावर्षी रिलीज होणार आहे.

अमिताभ बच्चनचा इमरान हाशमीसोबतचा ‘चेहरे’, सुजीत सरकार द्वारा दिग्दर्शित विकी कौशल (Vikcy Kaushal) अभिनीत ‘सरदार उधम सिंह’ या सिनेमांसह अजूनही काही सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहेत. प्रेक्षक या सगळ्या सिनेमांचे कसे स्वागत करतात याकडे आता बॉलिवूडचे (Bollywood) लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER