वंचितचा बडा नेता काँग्रेसच्या गळाला, आज पक्षप्रवेश

कवळे गुरुजी - अशोक चव्हाण

नांदेड : वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) विधानसभेची निवडणूक लढलेले मारोती कवळे गुरुजी हे काँग्रेसच्या (Congress) गळाला लागले आहेत. उमरी तालुक्यातील एक प्रभावी नेते म्हणून ओळख असलेले कवळे गुरुजी (Kawale Guruji) आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कवळे गुरुजींच्या काँग्रेस प्रवेशाने नायगांव विधानसभा मतदारसंघातील चित्र बदलण्याची शक्यता आहे.

कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोती कवळे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. पतपेढीच्या माध्यमांतून कवळे गुरुजींनी हजारो शेतकऱ्यांना आर्थिक हाथभर लावत पायावर उभे केलं. दूध, गुळाच्या व्यवसायात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आपल्याशी जोडलेल आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक असलेले कवळे गुरुजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) कार्यरत होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे खास नेते म्हणून देखील कवळे गुरुजींची ओळख आहे. मात्र गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीत उडी मारली आणि नायगाव विधानसभा लढवली. या निवडणुकीत त्यांनी भरघोस मते घेतली मात्र इथून भाजपचा उमेदवार विजयी झाला. या अपयशानंतर कवळे गुरुजी गेली वर्षभर राजकारनापासून काहीसे दुर राहिले.

काही दिवसांपूर्वी मंत्री अशोक चव्हाण यांचा वाघलवाडा इथला साखर कारखाना कवळे उद्योग समूहाने विकत घेतला. या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, आणि त्याच वेळी कवळे गुरुजींची राजकीय दिशा स्पष्ट झाली. कवळे गुरुजी आज अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उमरी इथे हजारो समर्थकांच्या साक्षीने कवळे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वच नेते या पक्ष प्रवेश सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER