महाराष्ट्रातील वंशपरंपरेच्या राजकारणातील प्रमुख राजकीय घराणे

Maharashtra Politicians

मुंबई :  महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेते स्वत:ला 12 कोटी जनतेच्या कुटुंबातील असल्याचा दावा करत असले तरी अनेक राजकारणी लोकांचे राजकारण कुटुंब केंद्रीत आहे. त्यापैकी अनेकांच्या चौथ्या तर काहींची तिसरी आणि दुसरी पीढी राजकारणात आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातील 36 जिल्हे बघितले तर तुम्हाला दिसून येईल कि तुम्ही कुठल्या तरी स्थानिक राजकीय घराण्यातील नेत्यांच्या क्षेत्रात प्रवेश करत आहात. हे कुटुंब राज्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षात आणि भूभागात आपला ठसा उमटवत असल्याचे दिसते.

त्यापैकी अनेक जण आपल्या कुटुंबाचे नाव आणि आडनावाच्या महिमेखाली काम करताना दिसतात. यासाठी अनेकांनी वंशपरंपरागत मार्ग स्विकारला आहे. परंतु अनेक तथाकथित राजकीय वंशावळ येथे राहत आहे.

ही बातमी पण वाचा : मोदींनी गांधी परिवाराला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याने आमच्याशी युती केली नाही : आंबेडकर

याची सुरुवात सत्तारुढ भाजपापासून केली तर असे दिसून येते कि, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनसंघाचे नेते आणि आमदार गंगाधरराव फडणवीसांचे चिरंजीव आहेत. त्याचप्रमाणे राज्याच्या माजी मंत्री आणि आणि आमदार शोभाताई फडणवीस या त्यांच्या काकू आहेत.

सत्तारुढ युतीतील भाजपचा घटक पक्ष शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांची दुसरी पिढी उद्धव ठाकरे यांच्या रुपाने कारभार सांभाळत आहे तर त्यांची तिसरी पिढी त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे भविष्यातील वंशपरंपरेचे राजकारण सांभाळण्यासाठी धडे गिरवत आहे.

ही बातमी पण वाचा : कोण कुणाला तुरुंगात टाकणार ?

बाळासाहेबांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे याशिवाय त्यांचे चुलते रमेश ठाकरे, शालिनी ठाकरे आणि राज यांचा मुलगा अमित ठाकरेसुद्धा आपले वडील राज ठाकरे पावलावर पाऊल टाकत आहे.

काँग्रेसकडे बघितल्यास अहमदनगर येथील विखे-पाटील यांची चौथी पिढी राजकारणात आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून तर ही सुरुवात होते त्यांनी आशियातील पहिला साखर कारखाना काढला होता.

त्यांचे चिरंजीव एकनाथराव उर्फ बाळासाहेब विखे-पाटील एनडीए सरकरमध्ये केंद्रीय मंत्री होते. तर त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेता आहे आणि आता त्यांचे चिरंजीव सुजय हे तरुण पिढीतील राजकारणी आहेत.
त्यांचे अन्य दोन पुत्र राजेंद्र विखे पाटील हे प्रमुख अॅकेमिडीशियन आहे तर दुसरे अशोक विखे-पाटील शिक्षणतज्ज्ञ आहेत. मुलगी निला ही स्विडीश पंतप्रधान स्टिफन लोफेव्हन यांची राजकीय सल्लागार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी काँग्रेस नेते शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात आहे. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या बारामतीतून खासदार आहेत. त्यांचे धाकटे बंधू प्रताप पवार मीडिया ग्रुप सकाळ पेपर्स प्रा, लि. चे प्रमुख आहेत.
शरद पवार यांचे मोठे बंधू अनंत पवार यांचे आक्रमक राजकारणी चिरंजीव अजित पवार हे आहेत. ते माजी उपमुख्यमंत्री होते. त्यांचे चिरंजीव पार्थ पवारसुद्धा माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि त्यांच्या सातारा आणि कोल्हापूर येथील दोन शाखा. याशिवाय फलटण येथील राजघराणे आज राजकारणात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुखांत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आहेत. ते 450 वर्षांपूर्वीच्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे (सातारा) यांचे 13 वे वंशज आहे. तसेच सध्याचे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांचे नातेवाईक आहे.

आणखी एक उत्तराधिकारी छत्रपती संभाजी राजे(कोल्हापूर) हेदेखील भाजपचे खासदार आहेत.

नाईक-निंबाळकर घराणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथम पत्नी राणी सईबाई यांच्या माहेरच्याकडून आहेत आणि त्यांचे उत्तराधिकारी रामराजे नाईक-निंबाळकर सध्या आमदार असून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब राजकारणात आहे. रिपब्लिनक पार्टीचे नेते आणि माजी आमदार यशवंतराव आंबेडकर यांचे चिरंजीव आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे सुद्धा राजकारणात आहेत.

1 जानेवारी 2017 रोजी झालेल्या भीमा-कोरेगाव दंगलीनंतर अटक करण्यात आलेले प्रकाश आंबेडकर यांचे बहिण जावई प्रा. आनंद तेलतुंबडे यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर मीडियाच्या हेडलाईनवर होते.
इतर बरीचशी महत्वपूर्ण कुटुंब आहेत कि ज्यांचे नाव राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणात आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुनिल दत्त आणि त्यांच्या कन्या तसेच माजी खासदार प्रिया दत्त यासुद्धा या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रिंगणात आहेत.

त्याचप्रमाणे दिवंगत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या कन्या व खासदार पूनम महाजन. प्रमोद महाजन यांचे बहिण जावई व माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे राज्यात मंत्री आहेत तर दुस-या कन्या प्रितम मुंडे भाजपच्या खासदार आहेत.
गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे महाराष्ट्रातील विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता आहेत. ते आधी भाजपत होते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

सांगली येथील पाटील कुटुंबातील माजी मुख्यमंत्री तसेच माजी राज्यपाल वसंतदादा पाटील, त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील या खासदार आणि राज्यमंत्री होत्या. मुलगा प्रकाशबापू पाटील हे सुद्धा खासदार होते. नातू प्रतिक पाटील केंद्रीय मंत्री होते. तर दुसरे नातू विशाल शेतकरी स्वाभिमानी पक्षाच्या तिकीटावर सांगली येथून निवडणूक लढवत आहे.

नांदेडचे चव्हाण कुटुंब हे सुद्धा राजकारणातील महत्वाचे कुटुंब आहे. शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री होते. तसेच अनेक पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या विभागाचे मंत्री होते. त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण हे सुद्धा माजी मुख्यमंत्री होते तसेच सध्या खासदार आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

माजी केंद्रीय मंत्री दाजीबा आर चव्हाण यांची चव्हाण शाखा राजकारणात आहे. त्यांच्या पत्नी प्रमिला चव्हाण या खासदार तर मुलगा पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री सुद्धा होते.

मुंबईतील येथील माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलींद देवरा हेसुद्धा माजी केंद्रीय राज्यमंत्री होते आणि खासदार होते. सध्या ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

लातूरचे देशमुख कुटुंबात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख हे माजी केंद्रीयमंत्रीसुद्धा होते. त्यांचे पुत्र अमित देशमुख अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस आहेत. विलासरावांचे धाकडे बंधू दिलीपराव डी देशमुख आमदार आणि माजी मंत्री होते.

सोलापूर येथे पोलिस खात्यातून राजकारणाकडे वळलेले मृदूभाषी सुशिलकुमार शिंदे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री होते. त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे या आमदार आहेत.

रायगड येथील स्ट्राँगमॅन आणि माजी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री अब्दुल रहमान अंतुले यांनी राज्याचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री म्हणून इतिहास घडवला. त्यांचे चिरंजीव नावेद यानी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. पुतणे मुश्ताक अंतुले हेसुद्धा राजकारणात आहे.

सिंधूदुर्ग येथील शिवसेना नेता आणि माजी मुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस नेते, स्वाभिमामी पार्टीचे संस्थापक आणि सध्या खासदार असलेले नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश आणि निलेश क्रमश: आमदार आणि खासदार आहेत
नाशिक येथील भुजबळ कुटुंबाली छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून माजी उपमुख्यमंत्री होते. त्यांचे चिरंजीव पंकज आमदार आहेत तर पुतण्या समीर मगन भुजबळ हे माजी खासदार आहेत.

सांगली येथील आणखी एक महत्वाचे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांची पत्नी सुमन या आमदार आहेत आणि त्यांच्या ज्येष्ठ कन्या स्मिता युवा कार्यकर्ता असून वेगवेगळ्या मोहिमेच्या त्या प्रमुख आहेत.

आणखी एक माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव व माजी खासदार रणजितसिंह पाटील यांनी मागील महिन्यातच भाजपत प्रवेश केला होता.