अन् मनसेच्या शाखेत भोसले-परब जोडप्याचं ‘शुभमंगल’ पडले पार

MNS - Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे . ठाकरे सरकारने १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे . या लॉकडाऊन काळात अनेक गोष्टींवर निर्बंध आले. त्यात लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त माणसांना सहभागी होण्यास बंदी घातली आहे. कोणत्याही हॉलने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर सरकारकडून कारवाई होण्याची भीती आहे. म्हणून अनेक जण ऐनवेळी लग्न समारंभासाठी घेतलेले बुकींग रद्द करत आहेत .

प्रसाद सावंत भोसले आणि अस्मिता परब यांचा विवाह सोहळा २८ एप्रिल रोजी भांडुपच्या सह्याद्री विद्या मंदिर इथं पार पडणार होता. मात्र त्यासही परवानगी नाकारली . ऐनवेळी शासनाच्या नियमांवर बोट ठेऊन शेवटच्या घटकेत कुटुंबीयांना ठरलेल्या तारखेला हॉल मिळणं शक्य नाही असं विद्यालयाकडून अचानक कळवण्यात आले. त्यामुळे आता पुढे काय करायचं असा प्रश्न दोन्ही कुटुंबीयांना पडला होता. अशावेळी कुटुंबीयांनी स्थानिक मनसेचे शाखाध्यक्ष सुनील नारकर यांच्याकडे धाव घेतली.

मनसे यावेळी मात्र परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता एका वेगळ्याच अंदाजाच या कुटुंबाच्या मदतीला धावली. आणि कधी नव्हे ते पहिल्यांदा मनसेच्या राजगड शाखेत शासकीय नियमानुसार २५ माणसांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याबाबत मनसेचे सचिव सचिन मोरे म्हणाले की, शेवटच्या क्षणी वधुवरांच्या कुटुंबीयांच्या मदतीला मनसे धावली. लग्न सोहळा पार पडला त्यामुळे जनमानसात मनसेबाबत असणारी आपुलकी आणखी वाढेल यात शंका नाही. राज ठाकरेंनी स्थापन केलेली ही संघटना पक्ष न राहता एक कुटुंब होत चालली आहे. या लग्न प्रसंगात शाखाध्यक्ष सुनील नारकर यांनी कुटुंबाची जी मदत केली त्याचं कौतुक आहे असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button