रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम काम करणाऱ्या कृती दलांचा होणार ‘कोरोना लढा सन्मान’ ने गौरव

रत्नागिरी(प्रतिनिधी) :  रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. ती रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक गावात कृती दल स्थापन करण्यात आले असून कोरोना संदर्भात उत्तम काम करणाऱ्या या कृती दलांना ‘कोरोना लढा सन्मान’ म्हणून गौरविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली.

या सन्मान प्राप्त होणाऱ्यालाल्हास्तरावर 2 लाख पारितोषिक तर तालुका स्तरावर 1 लाख, 50 हजार, 25 हजार आणि मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येणार आहे, हा उपक्रम रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हाती घेतला असून निश्चतच जिल्हा या कोरोनावर मात करेल असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला. या उपक्रमात काम करणाऱ्या कृती दलला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गावात एक प्रकारे उत्तम काम सुरू राहील. एक सिस्टीम डेव्हलप होईल व लोकांमध्ये कोरोनाबाबत अधिक जनजागृती होईल या उद्देशाने ‘कोरोना लढा सन्मान’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होईल. असा उपक्रम राबवणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील बहुधा पहिला जिल्हा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER