द बेस्ट ऑस्कर एव्हर … व्हीडिओतून राम गोपाल वर्मांनी केली मोदींची टिंगल

Maharashtra Today

मुंबई : कोरोनाच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी शुक्रवारी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने संवाद केला. यावेळी, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांबद्दल बोलताना मोदींना अश्रू अनावर झाले. चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ऑस्कर पुरस्कार वितरणाचा व्हीडीओ मार्फ करून, अभिनयासाठी नरेंद्र मोदींना पुरस्कार घोषित झाल्याचे सांगून त्यांची टिंगल केली आहे.

व्हीडिओ

व्हीडीओत राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma)यांनी ऑस्कर सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. हा एडिटेड मॉर्फ व्हिडिओ आहे. व्हिडिओत अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स ऑस्कर विजेत्याचे नाव घोषित करत असते. यावेळी मोदींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील भावूक भाषणाची झलक दाखवण्यात आली आहे आणि त्यानंतर तो ऑस्कर पुरस्कार मोदींनाच मिळतो, असे दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओच्या शेवटी अभिनेत्री जेनिफर “अँड ऑस्कर गोज टू”, असे म्हणते आणि त्यानंतर स्क्रिनवर ऑस्कर पुरस्कार घेतलेले ‘एडिटेड’ मोदी दिसतात, सभागृहातील लोक टाळ्या वाजवतात.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button