असमर्थता लपवण्यासाठी ‘बनारस मॉडेल’चा प्रयत्न; नवाब मलिकांची मोदी सरकारवर टीका

Nawab Mailk & PM Narendra Modi

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमधील मतदारसंघात डॉक्टरांशी संवाद साधला. वाराणसीने कोरोना रोखण्यात यश मिळविल्याचे कौतुक मोदींनी केले. या संकटकाळातील अपयश लपवण्यासाठी देशातील कोरोना रोखण्यात ‘बनारस मॉडेल’ उत्तम आहे, असा प्रचार केला जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. बनारसच्या घाटावरील प्रेतांवर अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती. लोकांनी प्रेते गंगा नदीत टाकली.

या घटनेची देशभर चर्चा झाली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोरोनाविरोधात लढण्यासाठी ‘बनारस मॉडेल’चा प्रचार करण्यात येत आहे. कोरोनाकाळातील असमर्थता लपवण्यासाठी हा प्रयत्न आता केला जात आहे, असा दावा मलिक यांनी ट्विट करून केला आहे. ‘बनारस मॉडेल’ असा काही प्रकारच नाही. बनारसमध्ये ना टेस्टिंग होत होती, ना उपचार होत होते. फक्त औषधांचा काळाबाजार झाला. ऑक्सिजन काळ्याबाजारात विकला गेला. ‘बनारस मॉडेल’ हे ‘निदान मॉडेल’सारखे फेल आहे. यामुळे ‘बनारस मॉडेल’चा प्रचार बंद करा, असे ते म्हणाले.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button