गोडसे ज्ञानशाळेला सुरूवात

Nathuram Godse - Godse Study Centre

भोपाळ : नाथुराम गोडसे (Nathuram Godse) समर्थकांनी त्यांच्या नावाने ज्ञानशाळेला सुरूवात केली असल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

मध्य प्रदेशमधील ग्वालियर शहरात दौलगंज स्थित अखिल भारतीय हिंदू महासभा कार्यालायात रविवारी ‘गोडसे की ज्ञान शाला’ चे आयोलन करण्यात आले. हा कार्यकम्र कार्यालयात सुरू असताना बाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. कार्याक्रमा दरम्यान कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी केली. तसेच, काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. हिंदू महासभेचे डॉ. जयवीर भारद्वाज यांनी ज्ञानशाळा सुरू करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचा इतिहास आणि त्यांचे वीर बलिदान लक्षात ठेवण्यासाठी ही शाळा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER