कोल्हापुरात नव्या राजकारणाची नांदी

कोल्हापूर : जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांविरोधात शड्डू ठोकलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) आगामी काळात एकत्र येण्याची शक्यता आहे.

सध्या भाजपच्या छावणीत असलेले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात ठेवली होती. गोकुळ व राजाराम साखर कारखान्यासह अनेक सहकारी संस्था, बाजार समित्यांवर पकड मिळविली होती. २००४ साली महापालिकेच्या राजकारणात आमदार विनय कोरे यांनी उडी घेतली आणि महाडिक यांच्या एकाधिकारशाहीला आवाहन दिले. मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व कोरे यांनी त्यावेळी महाडिक यांना बाजूला करून महापालिका ताब्यात घेतली. मात्र महाडिक यांनी राजकीय वर्चस्व कायम राखत २०१४ नंतर जिल्ह्यातील एक खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षपद त्याच्याकडे ठेवले. मात्र २०१९ च्या विधान परिषद निवडणुकीत स्वतः महाडिक, लोकसभेला पुतणे धनंजय व विधानसभेला पुत्र अमल यांचा झालेला पराभव महाडिक गटाचे राजकारणाला धक्का देणारा ठरला.

तर इचलकरंजी मतदार संघात माजी आमदार सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) यांनी घराणेशाहीला सुरुंग लावत दोन वेळा आवाडेंना पराभूत केले. सहकारी संस्थांचा गड असतानाही काँग्रेसचे वरिष्ठही साथ देत नसल्याची खदखद आवाडे कुटुंबीयांत वाढली. त्यामुळेच आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला. २००४ मध्ये जनसुराज्य शक्तीची स्थापना करून विनय कोरे यांनी स्वतःसह तीन आमदार निवडून आणले. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना अपारंपरिक ऊर्जा मंत्रिपद मिळाले. २००९ मध्ये पुन्हा आमदार झाले.

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सत्यजित पाटील यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी पाटील यांचा पराभव करून पुन्हा पुन्हा बाजी मानली. कोरे, महाडिक आवाडेंना हे तिघे भाजप सोबत आहेत. हा तिघांना एकत्र आणणारा दुवा आहे. तिघेही स्वातंत्र्य सामर्थ्यावर राजकारणात यश मिळणे अवघड आहे. राजकीयवैर विसरून एकत्र आलो तरच जिल्हा ताब्यात ठेऊ शकतो. या अपेक्षेने तिघे एकत्र येण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER