कोकणातील सौंदर्य पर्यटकांना खुणावतेय

Kokan

रत्नागिरी : कोकण रेल्वेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमधील परशुराम घाटातून दिसणारा नयनरम्य रेल्वे मार्ग, उक्षी धबधब्याच्या पार्श्वभूमीवर तेथील पुलावरून धावत जाणारी रेल्वे गाडी, पानवल पूल, डिंगणी-फुणगूसमधील वाशिष्ठी नदीवरील रेल्वे पूल तसेच निवास रेल्वे स्थानक परिसर हे पाईंट अलीकडच्या काही वर्षांत ‘रेल टुरिझम साठी पसंतीचे पाईंट ठरले आहेत. या ठिकाणांहून कॅमेऱ्यात बंदिस्त होणारे कोकणचे सौंदर्य देश-विदेशातील पर्यटकांना खुणावू लागले आहे.

कोकणातील विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळी पोफळीच्या बागा तसेच पावसाळ्यात येथील निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल यामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून जाते. यावेळी कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून देशभर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे इतर बहुतांश व्यवसायांमुळे कोकणातील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. केंद्र शासनाच्या ‘अनलॉक-4’च्या घोषणेनंतर याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून महाराष्ट्र शासनाने देखील प्रवासावरील बंधने शिथिल केल्याने आता हळूहळू थांबलेले व्यवहार गती पकडू लागले आहेत. अजूनही कोकणातील मोठी हॉटेल तसेच अतिथीगृह बंद असल्याने येथील पर्यटन व्यवसायाला गती मिळालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER