तलासचं ते युद्ध ज्यामुळं जगानं ओळखलं  ‘कागदाचं’ महत्व आणि बदलला जगाचा नकाशा !

Maharashtra Today

एक सामान्य यौद्धा ज्याच्या असामान्य कर्तृत्वामुळं जगाच्या इतिहासावर उमटली स्वतःच्या नावाची मोहोर. ते तलासचंच युद्ध (The battle of Talas)  होतं. या युद्धामुळंचं जगानं कागद बनवण्याची कला आत्मसात केली. जर हे युद्ध झालं नसतं तर आज जगाचा नकाशा काही औरच झाला असता.

चीनचा मध्य आशियाच्या बाजूनं विस्तार वाढायला सुरुवात झाली होती. या जगप्रसिद्ध युद्धात अरबांनी चीनचा पराभव केला. या युद्धात अरबांना तुर्क आणि तिबेटची सोबत होती.

तांग साम्राज्य करत होतं विस्तार

चीनचं तांग साम्राज्य आणि मुस्लीमांचं खिलाफत सातत्यानं विस्तार करत होतं. दोन्ही बाजूंनी मध्य आशियावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. दोन्ही साम्राज्या एकमेकांच्या तोडीस तोड होती. दरम्यान एक असं युद्ध झालं ज्यानं जगाचा नकाशाच बदलला. या सततच्या युद्धामुळं अनेकांच्या हृदयाचा थरकाप उडाला.

सन ६१८ मध्ये चिनच्या तांग साम्राज्यानं एका पाठोपाठ एक प्रदेश जिंकत अशियावर कब्जा करण्याची मोहीम आखली. त्यांनी पश्चिमेच्या तुर्कांचाही पराभव केला होता. तांग साम्राज्याच्या सीमा अत्यंत जलद गतीनं सीमांचा विस्तार करत होत्या. अनेक महत्वपूर्ण प्रदेश तांग साम्राज्याच्या छत्रछायेखाली होते.

६३० पर्यंत तुर्की साम्राज्यालाही सामावून घेण्यास तांग साम्राज्यानं सुरुवात केली. सन ७१५ पर्यंत चीननं अशिया खंडावर मोठं प्रभुत्व मिळवलं. खासकरुन पश्चिमेवर.  तिबेटशी वारंवार होणारा संघर्ष सुरु ठेवून सुद्धा त्यांनी पश्चिमेत मजल मारली होती.

अब्बासिद साम्राज्याचा उदय

चीनच्या वाढत्या प्रभावाप्रमाणंच मुस्लीम खिलाफतीनं प्रभाव वाढवायला सुरुवात केली. त्यांनी रोमन सहित अनेक मोठ्या साम्रज्यांना स्वतःत सामील करुन घेतलं होतं.  याच काळात आणखीन एक मुस्लीम साम्राज्य उभारी घेत होतं. स्पेनपासून मध्य आशियापर्यंत त्यांनी पाय पसरायला सुरुवात केली होती. अरबमध्ये शिरुन त्यांनी साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली होती. या खिलाफतीनं ७१५ पर्यंत जगातला मोठा भूभाग आपल्या ताब्यात घेतला होता.

पहिल्यांदा सन ७१५ ला फरगना घाटात चीन आणि मस्लिम साम्राज्यावादी खिलाफतवाले सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले. यात खिलाफतीचा पराभव झाला. या घटनेच्या दोन वर्षानंतर चीननं पुन्हा सैन्य पाठवलं.

उम्मयद साम्राज्य कमजोर पडत असताना, अस- सफाह याच्या नेतृत्वात विद्रोह्यांनी स्वतःच्या विजयासोबत नव्या साम्राज्याचा पाया रचला ज्याला अब्बासिद साम्राज्य म्हणून ओळखलं जातं.

त्या राजाचं शिर कलम झालं म्हणून

चीनमध्ये यादवीला तोंड फुटलं. त्यात चीनचा धुरंधर सरदार काओनं याचा फायदा उचलत लहान मोठी राज्य जिंकायला सुरुवात केली. सन ७५० ला फरगनाचा राजा आणि शेजारील राष्ट्र चच मध्ये सीमा विवादाला सुरुवात झाली. फरगनाच्या राजानं काओची मदत मागितली. काओनं मदत तर पोहचवली पण नंतर चच नावाचा प्रदेश ताब्यात घेतला आणि त्या राज्याचं शिर कलम केलं; पण त्याचा मुलगा यातून बचवला त्यानं अब्बासिद साम्राज्य गाठलं आणि अबूला मदत मागितली.

अबु मुस्लिम आणि जिया इब्र सलीह यांनी पुर्वेच्या दिशेनं कुच केली वाटेत वेगवेगळी सेना त्यांना मिळाली. चीन जिंकण्याची महत्वकांक्षा मनात घेऊन तो निघाला होता.

पाच दिवस चाललं युद्ध

जुलै ७५१ मध्ये दोन्ही मोठे साम्राज्य एकमेकांसमोर आले. चीनी सैन्य फक्त ३० हजार होतं तर अरबी सैन्याची संख्या १ लाख होती. दोन्ही सैन्यांमध्ये मोठं युद्ध झालं. पाच दिवस हे युद्ध चाललं. युद्धाच्या निर्णायक वळणावर तुर्कांनी चीनची साथ सोडून अरबांना जवळ केलं. चीनच्या या युद्धात पराभव झाला.

अबासिदनं चीन जिंकला पण संसाधनांची कमी असल्यामुळं त्याला परतावं लागलं.

कागद बनवण्याच्या कलेचा शोध लागला

काओच्या पराभवानंतर त्यानं उत्तेरेचा नाद सोडला त्यानं दक्षिणेकडं मोर्चा वळवत विद्रोही गटांचा समाचार घेतला. या युद्धात युरोपाीय सैन्याला कैद करण्यात आलं त्यात काही अरेबी सैनिक होते त्यांनी चीनी सैन्याकडून कागद बनवण्याची कला शिकली आणि परत या कलेचा जगभर विस्तार झाला. यामुळं ज्ञान संग्रहीत करून ते परत युद्धात वापरण्याची कला विकसीत झाली. आणि माहितीचं आदान प्रदान करण्याच्या प्रक्रीयेत मोठा विकास झाला. या कागद वापरण्याच्या कलेमुळेच चीन आपल्या साम्राज्य विस्तार केला.

यानंतर कित्येक शतकानंतर औद्योगिक क्रांती झाल्यानंतर सन ११२० मध्ये युरोपात स्पेनमध्ये पहिला कागद निर्मितीच्या कारखान्याची स्थापना झाली. यानंतर हे तंत्रज्ञान अरबांच्या ताब्यातील इटली आणि जर्मनीत याचा विस्तार झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER