श्रेयवादाची लढाई! ; याला म्हणतात ठाकरे ब्रँड” म्हणत मनसेचा उद्धव ठाकरेंना चिमटा

Raj Thackeray - Uddhav Thackeray - PM Modi - Maharastra Today
Raj Thackeray - Uddhav Thackeray - PM Modi - Maharastra Today

हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा देण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिल्यानंतर काही तासातच त्याला परवानगी मिळालेली आहे . यानंतर मनसेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे . याला “ठाकरे ब्रँड” म्हणतात, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सरकारला टोला लगावला.

“राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिन्सला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राज ठाकरेंचं पत्र गेल्यावर आली. याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”. कोरोना काळात “राजकारण” नको म्हणणाऱ्यांनी आभार मानायला हरकत नव्हती.” असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

दरम्यान केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु केले जाणार आहे. मात्र त्यापूर्वी राजकीय वर्तुळात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

केंद्राच्या या परवानगीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरेंनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button