‘ऑड्रे नेशन डू मेरिट’ पुरस्कार प्राप्त डॉ. रोहिणी गोडबोले यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

Uddhav Thackeray - DR. Rohini Godbole

मुंबई : फ्रान्सचा ‘ऑड्रे नेशन डू मेरिट’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले (DR. Rohini Godbole) यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अभिनंदन केले.

संदेश

महाराष्ट्र सुपुत्री ज्येष्ठ पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे फ्रान्स सरकारकडून वैज्ञानिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा मानाचा ”ऑड्रे नेशन डू मेरिट” पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. या पुरस्काराने महाराष्ट्र आणि देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. डॉ. गोडबोले यांच्या वैज्ञानिक संशोधन कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे. पदार्थविज्ञान क्षेत्रातील महत्वपूर्ण संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER