कोरोना काळात भारताने केलेली मदत विसरता येणार नाही; अमेरिकेने व्यक्त केली कृतज्ञता

Maharashtra Today

वॉशिंग्टन :- परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S. Jaishankar)यांनी शुक्रवारी अमेरिकन समकक्ष अँटनी ब्लिंकेन (Anthony Blinken) यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आणि करोना काळात भारताची साथ दिल्याबद्दल जो बिडेन प्रशासनाचे आभार मानले. उत्तरात अँटनी ब्लिंकेन म्हणालेत – करोनाच्या सुरवातीच्या काळात भारताने अमेरिकेला केलेली मदत अमेरीका नेहमी स्मरणात ठेवील. आम्ही खात्री देतो की, या कठीण काळात आम्ही भारतासोबत उभे आहोत.

२० जानेवारी रोजी बिडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेच्या अधिकृत दौर्‍यावर जाणारे जयशंकर हे देशाचे पहिले कॅबिनेट मंत्री आहेत. जयशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आम्ही बर्‍याच मुद्द्यांवर चर्चा केली. मला वाटते की गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील संबंध खूप मजबूत आहेत आणि मला विश्वास आहे की भविष्यातही असेच राहतील. कठीण काळात भारताची मदत केल्यामुळे जो बिडेन प्रशासन आणि अमेरिकेचे आभार मानतो.”

भारत आणि अमेरिका करोनाकाळात सोबत काम करत आहे. या दरम्यान अनेक आवाहनांचा सामना आम्ही एकत्र करत आहोत, असे ब्लिंकेन म्हणाले. एस. जयशंकर यांनी इंडो-पॅसिफिक आणि भारत आणि अमेरिकेमधील आरोग्य, डिजिटल, ज्ञान आणि अन्य क्षेत्रांमधील भागीदारीशी संबंधित मुद्द्यांविषयी आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू आणि बिडेन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विस्तृत चर्चा केली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांची घेतली भेट

एस. जयशंकर यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस यांची भेट घेतली. कोरोना साथीच्या आजारांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर विस्तृत चर्चा केली. जागतिक स्तरावर त्वरित व प्रभावी ‘जागतिक लस’ उपाय शोधण्याची मोठी गरज असल्याचे अधोरेखित केले. यावर्षी जानेवारीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्य म्हणून भारत सामील झाल्यानंतर जयशंकर यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांशी पहिलीचं बैठक होती.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button