हिटलवरवर जीव ओवाळणाऱ्या जर्मन अधिकाऱ्यानेच हत्येचा कट रचला!

Maharashtra Today

जगभराच्या इतिहासात विरता, त्याग, गद्दारीसह कटकारस्थानांचाही उल्लेख आहे. अनेक राजे महाराजे, राजकीय नेत्यांच्या खुनांची कारस्थानं रचण्यात आली. फिल्मी कथानकाप्रमाणं अनेक कटकारस्थानं इतिहासाकरांनी मांडली आहेत. असाच एक शिजला होता. २० जुलै १९४४ मध्ये जर्मनीत कट घडवण्यात आला होता जर्मनीचा हुकुमशहा अडोल्फ हिटलर (Adolf Hitler) याला संपवण्याचा.

या कटाला पुर्णत्व देण्यासाठी झटणारा माणूसही जर्मन होता. फक्त तो जर्मनीचा नागरिक नव्हता तर नाझी सैन्यात मोठ्या हुद्द्यावर होता नाव होतं क्लॉज वॉन स्टॉफनबर्ग. युद्धात एक डोळा गमावलेल्या या कर्नलला हिटलरचे डोळे कायमस्वरुपी बंद करायचे होते.

हिटलरचा उदय

ऑस्ट्रीयात २० एप्रिल १८८९ मध्ये अडोल्फ हिटलरचा जन्म झाला. त्याचे वडील सरकारी नोकर होते. हिटरला सरकारी नोकरीबद्दल कधी आपुलकी वाटली नाही. त्याला उच्च दर्जाचा चित्रकार बनायचं होतं. वयाच्या १४ व्या वर्षी त्याच्या वडीलाचा मृत्यू झाला. नंतर १७ व्या वर्षी त्याची आई जग सोडून गेली. हिटरल अनाथ झाला. तो ऑस्ट्रियाहून वियानला आला. तिथं त्यानं काढलेली चित्र विकून तो दिवस घालवू लागला. वियानात असताना त्याची राजकारणाबद्दलची आस्था वाढू लागली. त्यानं नवी विचार धारा जर्मनीला दिली. ‘नाझी’ विचारधारा.

पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं. वर्ष होतं १९१३ मध्ये. त्यानं जर्मनीतलं म्युनिक गाठलं. बरावियाच्या राजाला त्यानं केलेल्या विनंतीवरुन त्याला सैन्यात सामील करुन घेण्यात आलं. पहिल्या विश्वयुद्धातल्या पराक्रमामुळं त्यानं वरिष्ठांना खुष केलं पण त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही. जर्मनीचा लाजिरवाना पराभव झाला. या पराभवामुळं जर्मनीचा पराभव त्यांच्याच देशातल्या ‘ज्यु’ धर्मियांमुळं झाल्याचा संदेश चोहीकडे गेला. हिटलरच्या मनात हा विचार ठाण मांडून बसला होता. त्यानं नाझी पार्टीची स्थापना केली.

हिटरलनं पक्षांची स्थापना केली. जर्मनीत ज्यूंचा द्वेष आणि हिटलरी लोकप्रियता प्रचंड वाढत होती. हिटलरनं बघता बघता जर्मनीची सत्ता हातात घेतली. १९३३ साली त्यानं जर्मनी जिंकली. जर्मनीचा शासन बनल्यानंतर त्यानं सहा वर्षात साठ लाख ज्यूंची हत्या केली. हिटरल्या या हुकुमशाहीनं त्याचे अनेक शत्रु निर्माण केले. त्यापैकीच एक होते ‘क्लॉज वॉन स्टॉफनबर्ग.’ जे कधीकाळी जर्मन सैन्यात कर्नल पदावर होते.

नाझी समर्थ बनला विरोधक

स्टॉफनबर्ग यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९०७ चा बावेरियातला. फक्त १९ वर्षाच्या वयात त्यानं जर्मन सैन्यात प्रवेश केला. त्याच्या पराक्रमामुळं त्याला दिवसेंदिवस पदोन्नती मिळत गेली. अनेक सन्मानानं त्याला गौरवण्यात आलं. अनेक आघाड्यांवर त्यानं जर्मन सैन्याचं नेतृत्व केलं होतं.

स्टॉफनबर्ग नाझी नितींचे समर्थन करायचा. पण बदलत्या वेळेसोबत त्याला जर्मन सैन्याचे अत्याचार पहावले नाहीत. तो खुश अस्वस्थ राहू लागला. त्याला ही गोष्ट कळून चुकली होती. हिटलरला आपण जसा समजत होतो तो तसा नव्हता. हिटलरबद्दल दिवसेंदिवस त्याच्या मनात घृणा निर्माण होऊ लागली. स्टॉफनबर्ग समोर जेव्हा हिटलरच्या हत्येची सुपारी आली तेव्हा त्यानं क्षणार्धात होकार कळवला.

विस्फोट

स्टॉफनबर्ग आणि त्याच्या साथीदारांनी हिटलरच्या हत्येचा कट रचला. त्याला नाव दिलं ‘ऑपरेशन वॉल्कॅरी.’ योजना बनून तयार झाली सगळे मिळून ठरल्या दिवसाची वाट पाहू लागले. ही योजना पुर्णत्त्वाला नेण्याची जबाबदारी स्टॉफनबर्ग यानं स्वतःच्या खांद्यावर घेतली. १९४४ मध्ये त्यानं ‘जर्मनी रिप्लेसमेंट आर्मीत’ कमांडर पद मिळवलं. या पदासोबत त्याला अनेक अधिकार मिळाले.

२० जुलै १९४४ याच दिवशी हिटलरची हत्या केली जाणार होती. हिटलर जवानांसोबत बैठक घेतली. त्या दिवशी भयंकर उन होतं. काही वेळानंतर स्टॉफनबर्ग केबीनमधून बाहेर गेला आणि मोठा स्फोट झाला. तीन लोकांचा यात जीव गेला. योगायोगानं हिटलर वाचला. त्याला किरकोळ दुखापत झाली. ज्या ब्रिफकेसमध्ये बॉम्ब ठेवला होता. ती ब्रिफकेस हिटलरच्या आसनाजवळ ठेवली होती पण नंतर अधिकाऱ्यांनी बोलता बोलता नजर चुकीनं ब्रिफकेस हलवली. हेच कारण होतं ज्यामुळं हिटलर वाचला.

कट रचणाऱ्यांचा शोधाशोध करण्यात आली. खुन्यांचा पत्ता मिळताच हिटलरच्या आदेशानं स्टॉफनबर्गसहित त्याच्या साथिदारांच्या छातीची नाझी सैनिकांनी बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button