युद्धकला रणगाड्यांनी बदलली, जगातली ती युद्ध जी ‘रणगाड्यां’मुळं जिंकली गेली!

Tank - Maharastra Today

जुन्या काळात युद्धात हत्ती सहभाग घ्यायचे. युद्धातली सर्वात महाकाय असेल तर तो हत्ती असायचा. नंतर काळ बदलत गेला. अधुनिक शस्त्र आली. नंतर तोफा आल्या. मशिनगन्स आल्या आणि नंतर खाच खळग्यातून वाट काढत पोलादी पट्ट्यांवर धावणाऱ्या रणगाड्यांनी यात मोठी क्रांती घडवून आणली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं सर्वात जास्त रणगाडे मैदानात उतरवले होते. रणागाड्यांचा इतिहास मोठा रंजक आहे आणि विस्तृत सुद्धा रणगाड्यांच्या या इतिहासात रणगाड्यांची सर्वात मोठी लढाईबद्दल आजही अनेकांना माहिती नाहीये. अशाच रणगाड्यांच्या इतिहासावर टाकलेली ही एक नजर

रशियात झाली रणगाड्यांची सर्वात मोठी लढाई

ऱशिया हा पृथ्वीवरचा सर्वात विस्तृत देश आहे. या देशानं केलेल्या लढायासुद्धा तितक्याच मोठ्या. अशाच प्रकारे जगातील सर्वांत मोठी रणगाड्यांची लढाई १९४३ साली रशियात कूर्स्क या ठिकाणी झाली. त्या लढाईत जवळजवळ ३,००० रणगाड्यांचा उपयोग करण्यात आला व त्यानंतर १९४४ मध्ये अमेरिकेच्या जनरल जॉर्जपॅटनच्या तिसऱ्या सैन्याने १६ रणगाडा विभाग (डिव्हिजन) वापरून जर्मन सैन्याचा यूरोपमध्ये पराभव केला होता अशी इतिहासात नोंद आहे.

अमेरिका विरुद्ध रशिया युद्धात रणगाड्यांचा उपयोग

अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये जागतिक महासत्ता होण्याची स्पर्धा सुरु होती. ही स्पर्धा जिंकण्यासाठी वाट्टेल ते करायची आणि जगाला स्वतःच सामर्थ्य दाखवायची दोन्ही राष्ट्रांची तयारी होती. दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाच्या लढाईत (१९५०–५३) कोरियन सैन्याने रशियन रणगाड्यांचा व अमेरिकेने स्वतःच्या रणगाड्यांचा उपयोग केला परंतु त्या देशातील डोंगराळ भागामुळे, रस्त्यांच्या अभावामुळे व बचावाची फळी अत्याधुनिक साधनांनी भक्कम केली असल्याने त्यांचा फारसा प्रभाव पडला नाही परंतु रणगाड्यांचा उपयोग एकत्रितपणे केला पाहिजे, एवढे मात्र या लढाईत सिद्ध झाले. याच तंत्राचा उपयोग करून इझ्राएली फौजांनी (१९५६-५७) मध्ये अरब फौजांचा पराभव केला.

रणगाड्याचा पहिला प्रयोग

दोन चाकांवरती चालणाऱ्या तोफा आणि त्याचा उपयोग करुन शत्रु सैन्यावर आगीचे आणि विस्फोटाचे गोळे फेकणारी यंत्रणा आधी अस्तित्त्वा होती. पण जगाला पहिल्यांदा रणगाड्या सारख्या विक्राळ यंत्राचे दर्शन घडवले होते फ्रान्सने इ. स. १९१७ सालच्या फ्रान्समधील कँब्रे येथील लढाईत रणगाड्यांचा प्रथमच मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला. त्या लढाईत भारतातील घोडदळाचाही यशस्वी रीतीने उपयोग करण्यात आला होता. दुसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसू लागताच भारतीय घोडदळातील काही तुकड्यांना चिलखती रणवाहनांचे शिक्षण देण्यात आले.

भारतीय लष्करात रणगाड्यांचा सामावेश

इंग्रजांनी भारतीय लष्करात चिलखती गाड्या, चिलखती टेहळणी वाहने यांचा समावेश होता. त्यानंतर ब्रिटिश व अमेरिकन हलक्या रणगाड्यांचा उपयोग भारतीय लष्करात करण्यात आला. त्यांत व्हॅलेंटाइन व स्ट्युअर्ट रणगाड्यांचा समावेश होता. रणगाड्यांतील यांत्रिक व तांत्रिक सुधारणानंतर मध्यम प्रतीचे अमेरिकन शर्मन रणगाडे व पायदळाच्या मदतीसाठी खास वापरण्यात येणारे ब्रिटिश चर्चिल रणगाडे वापरण्यात आले. युद्धभूमिवरील अशक्य वाटणाऱ्या मोहिमा रणगाड्यांच्या सहाय्याने शक्य झाल्या. त्यामुळं नंतरच्या काळात रणगाड्यांना विशेष स्थान प्राप्त झाले. ब्रिटिशकालीन भारतातील वायव्य सरहद्दीवरील लढायांमध्ये चिलखती गाड्यांचा उपयोग होऊ शकला. दुसऱ्या महायुद्धामध्ये तिसावी इंडियन आर्मर्ड डिव्हिजन व अन्य रणगाड्यांच्या रेजिमेंटनी आफ्रिकेच्या व यूरोपच्या भूमीवरील लढायांत भाग घेतला.

पाकिस्तानाला सळो की पळो करुन सोडलं

स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यानं मोठ्या शौर्यानं शेजारील राष्ट्रांशी लढा दिला. भारताविरुद्ध कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानची जागा दाखवण्याचं काम भारतीय लष्करानं केलं. यात रणगाड्यांची महत्त्वाची भूमिका होती. १९६५ साली पाकिस्तानबरोबर झालेल्या लढाईत भारतीय फौजांनी स्ट्युअर्ट रणगाडे ५,००० मी. उंचीवरील झोजी या ठिकाणी नेऊन यशस्वी रीतीने त्यांचा उपयोग केला. त्या वेळी भारतीय फौजांच्या रणगाड्यांनी सियालकोट प्रदेशात फार मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांचा धुव्वा उडविला. भारतीय लष्करांमध्ये आजही अत्याधुनिक रणगाडे आहेत. देशावर येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज असलेल्या सैन्याची ताकद भारतीय रणागाडे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button