“आर्ट ऑफ सेइंग नो !”

Art of saying NO

“If you know to say’ No ‘ at times and how to receive a ‘No ‘at that times,then world becomes a much better place for you to live in .”

डॉक्टर आनंद नाडकर्णी (Anand Nadkarni) सरांच्या विधानात खरंच सुखी जीवनाचं एक रहस्य निश्चितपणे दडलेले आहे. आजुबाजूला बघतांना आपल्याला बरीच मंडळी अशा प्रकारची दिसतात. स्वतःच्या खऱ्या भावना त्या व्यक्तच करत नाहीत. मनावर दडपण असलेल्या अशा व्यक्तींना लोक गृहीत धरतातच .शिवाय कालांतराने त्यांचा सहवासही कंटाळवाणा व त्रासदायक वाटू लागतो. आपण मागे बघितल्याप्रमाणे “आय नोट ओके ” (I Not OK)अशा मनोवृत्तीचे हे लोक !

महेश प्रामाणिकपणे स्वतःचे काम पूर्ण करणारा भिडस्त मुलगा ! त्याचे इतर सहकारी त्याच्या भिडस्तपणा चा फायदा घेऊन त्याच्या माथी आपले काम मारून सहा वाजता घरी पळ काढतात. आणि महेश मात्र रात्री दहा दहा वाजेपर्यंत मानमोडे पर्यंत काम करत बसतो .पुन्हा बढती मात्र दुसऱ्यांना कोणालातरी मिळते.

संध्याची नेहमी तक्रार की तिला सगळेजण गृहीत धरतात. त्याचा तिला खुप त्रास होतो .एक गृहिणी असल्याने कोणी कोणत्याही वेळी जेवायला येतो म्हणून सांगतात आणि येऊन धडकतात. सासूबाईंना बरे नसल्याने त्यांचं करायला व घर सांभाळायला म्हणून संध्या जावेंच्या घरी गेली. जाऊ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना घेऊन परगावी राहते .ती आल्यावरच जबाबदारी सोपवून आपण वापस घरी जाऊ ,असे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे ती जबाबदारी सांभाळते पण! जाऊ मात्र ती केव्हा येणार, याची नेमकी कल्पना फोन करून संध्याला देतच नाहीये.अशावेळी संध्याला खूप वाईट वाटतं.आपण इतक्या का गृहीत धरल्या जातो. त्याचं कारण तिला कळत नाही .

अशी समोर आलेली आयुष्य निमूटपणे स्वीकारणाऱ्या लोकांचा वापर संबंधित सर्वच लोक करून घेतात. रांगेत उभे असताना मध्येच कोणी घुसलं तरी असे लोक ओरडत नाही. हॉटेलमध्ये वेटरचे लक्ष जाईपर्यंत हे त्याची येण्याची वाट बघत बसतात. ग्रुपमध्ये बसलेले असताना त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही किंवा घरातही एखाद्या ‘कच्चा लिंबू’ सारखी त्यांची भूमिका असते.

लहानपणी जे आपण पाहतो ,अनुभवतो त्यातून आपल्या स्वभावात भिडस्तपणा वा आक्रमक पणा, लाजाळूपणा येत असतो. आदर्श ,शांत ,समजूतदार विद्यार्थ्याच शाळेत व सर्वत्र कौतुक होतं, पण स्वतंत्र बुद्धीने वागणारा टीका सहन करतो. शाळेतील व घरच्या टीकेमुळे मोठेपणी एकतर उर्मट, भेदरट निष्क्रिय बनतो .नाहीतर आक्रमक !तसेच खूप आदर्शपणाच्या चौकटीत असलेल विद्यार्थी त्याची चौकट सांभाळतांना ,शारीरिक व मानसिक तणाव ग्रस्त होतो पण दुसऱ्याला नाही म्हणू शकत नाही.

  •  ठाम पणा न जमल्याने स्वतःला काय हवं नको ते मोकळेपणी न सांगणे किंवा इतरांच्या वागण्या बोलण्याने काय त्रास होतो किंवा परिणाम होतो हे अव्यक्त ठेवल्यामुळे गैरसमज होतात.
  • असहाय्यता,स्वतःला ताब्यात न ठेवू शकल्याने रागाने चडफडात होतो.
  • लोक गैरफायदा घेतात .
  • इतरांचे बोलणे, वागण न पटूनही बोलता न आल्यामुळे राग ताण नैराश्य भावनिक उद्रेक होऊ शकतो.
  • इतरांच्या पद्धतीने चालावे लागल्यामुळे कालनियोजन गोते खात.

दैनंदिन आयुष्यात ठाम पणाने वागणे-बोलणे कृती करणे हे एक कौशल्य आहे .ठामपणा म्हणजे कृतिशीलतेचा एक महत्त्वाचा पैलू.इतरांच्या हक्कांची जाणीव ठेवून व आदर राखत स्वतःच्या भावना, मत व विचार मोकळेपणाने व्यक्त करणे !आणि तसे करताना इतरांनइतकेच आपण सुद्धा महत्त्वाचे आहोत हे सकारात्मक पद्धतीने इतरांवर बिंबवणे म्हणजे ठाम पणा ने वागणे.

निश्चयपूर्वक वागणे म्हणजे मनमानी करणे व आक्रमक होणे मात्र नाही. तर विधायक पणे स्वतःला व्यक्त करणे, स्वतःच्या मूलभूत अधिकारांची जाणीव ठेवून, स्व आदर, आत्मसन्मान टिकवून ठेवणे हे ठामपणा मागचे सूत्र आहे.

टीनेजर्स मुलांसाठी ही “नाही म्हणण्याची कला “येणे फार महत्त्वाचे असते. कारण त्यांच्या भावना वयानुसार बऱ्याच तीव्र ,अनियंत्रित आणि आवेगशील असतात. जी मुलं अतिसंवेदनशील असतात ती पिअर प्रेशर ला , मित्रांच्या आग्रहाला बळी पडून चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात,अयोग्य वागू शकतात.

हेच बघा ना ! नववीच्या वर्गातल्या एका ग्रुप मधला हा प्रसंग ! त्यातील एक मुलगा, जो ग्रुपचा लीडर वाटावा , किंवा त्यांच्या भाषेत cool वाटणारा , त्याच्या मनात येत की “आज आपण मॅथ्स चा पिरेड बंक करू!! कशाला द्यायची टेस्ट? काय पडलाय त्यात? त्याऐवजी पिक्चर टाकू! “यावर सगळी मुलं होशी हो करतात.

त्यातील फक्त एक मुलगा सोहम त्याला मात्र नाही म्हणण्याची कला अवगत आहे. तो म्हणतो,”मलाही कल्पना नाही आवडली मॅथसटेस्ट ,क्लास बुडवण्याचे परिणाम योग्य नाहीत. त्यापेक्षा आपण पण घरी विचारून शाळेनंतर पिक्चर ला जाऊ शकतो त्यामुळे मी नाही येऊ शकणार तुम्हीपण यावर जरा विचार करावा. चला बाय!”

आपण ग्रुप मध्ये सगळ्यांना आवडावं इतरांनी आपली चेष्टा करू नये एकटे पडू नये व काही मुलं नवीन काहीतरी करण्यास उत्सुक असतात त्यामुळे “पिअर प्रेशरला” बळी पडतात. त्यामुळे “आर्ट टू से नो.” ती सगळ्यांना यायलाच पाहिजे.

अशा या ठामपणा ला इंग्रजीत “असरेटिवेनेस” (assertivenes). अशा व्यक्ती खऱ्या खंबीर, प्रत्येक गरजांच्या पूर्ततेसाठी आग्रही नसणाऱ्या ,तडजोड ,वाटाघाटी करण्यात यशस्वी अशा असतात! कंफर्टेबल असतात.!

याउलट इतरांना दुखवुन, दमदाटी करून ,भांडून, लबाडी करून फक्त स्वतःचाच विचार करून हवं ते कोणत्याही मार्गाने मिळवणे, हे दुसरे टोक aggressiveness! यांच्यात तात्पुरती जिंकण्याची भावना असते पण मनातून अपराधी भाव आणि इतरांचा रोषही ते अनुभवत असतात.

याठिकाणी एक गोष्ट आठवते .एका नाग खूप तापट , रागीट असतो आणि तो दिसला दिसलेल्या कोणालाही चावत सुटतो. सगळे गावकरी घाबरायला लागतात. खेड्यामध्ये एक सत्पुरुष येतात गावकरी त्यांना साखर घालतात की काही करा आणि या नागाचा बंदोबस्त करा त्या सत्पुरुषाच्या आशीर्वादाने नाग प्रभावित होतो आणि यापुढे तो कुणाला न चावण्याचा निश्चय करतो. पहिल्यांदा गावकऱ्यांचा यावर विश्वासच बसत नाही परंतु काहीजण त्याला टोचून बघतात प्रेमा वरून बघतात साप काही चावत नाही अशी खात्री पटल्यावर लोकांची भीड चेपते आणि ते ते आधीच्या रागाचा सूड घेण्यासाठी नागाला त्रास देऊ लागतात, नाग मात्र वचनाला बांधील असतो. थोडे दिवस गेल्यावर परत ते सात पुरुष गावात येतात ना त्यांना भेटतो आणि म्हणतो ,”माझ्या निर्णयाचा काय परिणाम झालाय पहा!

यावर सत्पुरुष म्हणतात,”बेछुट पणे कुणालाही चावणे बरे नाही ,यापासून तू स्वतःला रोख! ” असे मी तुला सांगितले होते .”पण धोक्याची शक्यता वाढल्यावर किंवा तुझ्या जीवावर बेतल्यावर, तू फणा उगारू नकोस .असे मी तुला म्हणालो होतो का?”
एकाच प्रसंगांमध्ये नागाच्या तीनही अवस्थांमधून आपण जात असतो. त्याचे आकलन होणे गरजेचे!

यात नेमकी कोणती अवस्था हवी ती आपण आपलं ठरवू शकतो. बरेचदा आपली आदर्श प्रतिमा जपण्यासाठी ,वाईट म्हणण्याची एकही संधी मिळू न देण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवून बसतो .तर कधी हे सगळं असह्य होऊन, यातून मार्ग काढण्यास बेजबाबदारपणे नकाराचा गोळीबार करतो. परिणाम व्हायचा तोच होतो ..

पण आपल्या उद्दिष्ट बाबतची स्पष्टता विशेष प्रयत्न येऊ शकते.

आक्रमकताविरहित ,योग्य संभाषणासाठी ,आपल्याला असणारे मूलभूत अधिकार कोणते ? आणि “असरेटिवेनेस “अंगी येण्यासाठी कोणती तंत्र वापरायची ? ते आपण बघणार आहोत उद्याच्या लेखात ! नाही म्हणण्याची कला,आपले म्हणणे ठाम पद्धतीने पण इतरांना न दुखवता सांगता येणे ही खरं तर एक गुरुकिल्ली आहे असे मला वाटते !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER